• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shraddha walkar murder case victim whatsapp instagram chat photo of face with injuries to manager screenshot as evidence of relationship scsg

“आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

पोलिसांनी श्रद्धा खून प्रकरणात पुरावा म्हणून जमा केलल्या या चॅटमध्ये नेमकं आहे तरी काय जाणून घ्या.

Updated: November 19, 2022 20:07 IST
Follow Us
  • Shraddha Walkar Murder Case Victim WhatsApp Instagram Chat Photo Of Face With Injuries To Manager screenshot as evidence of relationship
    1/33

    नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

  • 2/33

    काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.

  • 3/33

    श्रद्धाचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करुन आधी घरातील फ्रिजमध्ये ठेऊन नंतर तीन आठवड्यांमध्ये या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याच्या या क्रूर हत्या प्रकरणाची अगदी इंटरनेटपासून वृत्तवाहिन्यांवरही चर्चा आहे.

  • 4/33

    एकीकडे तपास सुरु असतानाच आता श्रद्धा आणि आफताबशी संबंधित इतर लोकांकडून नवीन माहिती रोज नव्याने समोर येत आहे.

  • 5/33

    श्रद्धाने तिच्या एका मित्राबरोबर तसेच ऑफिसमधील मॅनेरजरबरोबरच्या केलेल्या मेसेजिंगमधून आफताबकडून झालेल्या मारहाणीसंदर्भात माहिती समोर आली आहे.

  • 6/33

    श्रद्धाने केलेल्या व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजमध्ये केलेल्या खुलाश्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत.

  • 7/33

    श्रद्धाचे व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजेचे स्क्रीनशॉट समोर आले असून हे २०२० सालापासून श्रद्धा आणि आफताबचं नातं कसं होतं हे दर्शवणारा संवाद आहेत.

  • 8/33

    श्रद्धाचे मित्र आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांबरोबर दोन वर्षांपूर्वी केलेल्या चर्चेचे हे स्क्रीनशॉट असून यामधून आफताबने तेव्हाही श्रद्धाला बेदम मारहाण केली होती हे स्पष्ट होतं आहे.

  • 9/33

    आफताब सध्या श्रद्धाच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे.

  • 10/33

    श्रद्दाचा खून केल्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आफताबवर आहे. दिल्ली पोलीस तसेच मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 11/33

    दोन वर्षांपूर्वीच्या या चॅटमध्ये श्रद्धाला मारहाण करण्यात आल्याचं ती सांगत आहे. याच मारहाणीनंतर श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

  • 12/33

    २०२० साली श्रद्धा आणि आफताब वसईमध्ये रहायचे तेव्हाचे आहेत. या चॅटमधून दोघांचं नातं कसं होतं आणि आफताब कशाप्रकारे श्रद्धाला मारहाण करायचा यासंदर्भातील कल्पना सहज येते.

  • 13/33

    या चॅटनंतर आठवडाभराने म्हणजे ३ ते ६ डिसेंबर २०२० दरम्यान श्रद्धा वसईमधील एका खासगी रुग्णालयामध्ये खांदा आणि पाठीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेत होती. डॉक्टरांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • 14/33

    याच चर्चेनंतर दहा दिवसांच्या आताच श्रद्धाच्या खांद्याला आणि पाठीला गंभीर जखम झाली होती. २०२० साली श्रद्धा डॉक्टरांकडे उपचारांसाठी आली होती.

  • 15/33

    विशेष म्हणजे यावेळेस आफताबच तिला डॉक्टरांकडे घेऊन आला होता. नालासोपाऱ्यामधील ओझोन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आली होती.

  • 16/33

    श्रद्धावर त्यावेळी उपचार केलेल्या डॉक्टर शिव प्रसाद शिंदे यांनी श्रद्धासंदर्भातील माहिती एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

  • 17/33

    “श्रद्धाला ३ डिसेंबर २०२० रोजी रुग्णालयामध्ये चार दिवसांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पाठीचा तसेच खांदेदुखीचा त्रास होता. मात्र तिला ही दुखापत नेमकी कशामुळे झाली हे मात्र श्रद्धाने सांगितलं नव्हतं,” असं डॉक्टर शिंदे म्हणाले.

  • 18/33

    श्रद्धा ही आफताबरोबर रुग्णालयामध्ये आली होती, असंही डॉक्टरांनी सांगितलं. “आम्हाला तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा आफताब तिच्याबरोबर होता,” असं डॉक्टर शिंदे म्हणाले.

  • 19/33

    श्रद्धाच्या नाकाला आणि उजव्या डोळ्याखाली दुखापत झाल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंबरोबर माहितीमध्ये आफताबने मारहाण केल्यामुळे श्रद्धा जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

  • 20/33

    “ती आफताबबद्दल आणि त्याच्या व्यसनांबद्दल कायम तक्रार करायची. तो नेहमी तिच्याबरोबर वाद घालायचा आणि तिला मारहाणही करायचा,” असंही श्रद्धाचा मित्र राहुल राय याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

  • 21/33

    दोघांमधील या हिंसक नात्याची कल्पना व्हॉट्सअपवरील तसेच इन्स्टाग्रामवरील श्रद्धाच्या चॅटमधून येते. हे चॅट सध्या आफताब श्रद्धाला मारहाण करायचा याचा पुरावा म्हणून पोलिसांना जमा केले आहेत.

  • 22/33

    दोघांमधील या हिंसक नात्याची कल्पना व्हॉट्सअपवरील तसेच इन्स्टाग्रामवरील श्रद्धाच्या चॅटमधून येते. हे चॅट सध्या आफताब श्रद्धाला मारहाण करायचा याचा पुरावा म्हणून पोलिसांना जमा केले आहेत.

  • 23/33

    २४ नोव्हेंबर २०२० च्या या चॅटमध्ये श्रद्धाने “तो (आफताब) बाहेर जाईल याची मला खात्री केली पाहिजे” असंही म्हटलं आहे. तसेच त्याने त्याच्या पालकांशी यासंदर्भात चर्चा केल्याचंही तिने नमूद केलं आहे.

  • 24/33

    म्हणजेच या कालावधीमध्ये आफताब आणि श्रद्धाचं नातं संपुष्टात येण्याच्या मार्गावर म्हणजेच ब्रेकअपच्या मार्गावर होतं असा अंदाज बांधला जात आहे.

  • 25/33

    यापैकी एका चॅटमध्ये श्रद्धाने, “मी आज येऊ शकतं नाही. कारण काल मला झालेल्या मारहाणीमुळे माझा रक्तदाब कमी झाला आहे आणि मला फार वेदना होत आहेत. बेडवरुन उठण्याची शक्ती माझ्यात नाही,” असं ऑफिसमधील मॅनेजरला व्हॉट्सअप मेसेजवर कळवलं होतं.

  • 26/33

    यामध्ये श्रद्धाने स्वत:च्या चेहऱ्याचा फोटोही पुरावा म्हणून मॅनेरजला पाठवला होता. ज्यात तिच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसून येत आहे. या संवादाचे स्क्रीनशॉट सध्या दिल्ली पोलिसांकडे आहेत. “आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत,” असा रिप्लाय दिल्याचंही चॅटमध्ये दिसत आहे.

  • 27/33

    मॅनेजरने श्रद्धाला तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे असं विचारलं. यावरुनच श्रद्धाने ऑफिसमध्ये त्यांचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं असं म्हटलं जात आहे.

  • 28/33

    तसेच श्रद्धाच्या मित्राने त्याची आई आणि बहिणी श्रद्धाला मदत करु शकते असंही सांगितलं होतं. इन्स्टाग्राम चॅटमध्ये श्रद्धाने तिची नवीन हेअरस्टाइल दाखवण्यासाठी मैत्रीणबरोबर एक फोटो शेअर केला होता.

  • 29/33

    यावेळेस त्या मैत्रिणीने श्रद्धाच्या नाकावरील जखमांबद्दल विचारलं. त्यावर श्रद्धाने आपण शिड्यांवरुन पडल्याने नाकाला जखम झाल्यांचं तिला सांगितलं होतं. या चॅटचा स्क्रीनशॉटही पोलिसांनी पुरावा म्हणून जमा केला आहे.

  • 30/33

    आफताब आणि श्रद्धा यांचे २०१८ पासून नातेसंबध होते. २०१९ पासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. आफताब आणि श्रद्धा २०१९ मध्ये नायगाव येथील यशवंत प्राईड किणी कॉम्पलेक्स मध्ये पती-पत्नी असल्याचे सांगून भाड्याने राहत होते.

  • 31/33

    येथील भाडे करार संपल्याने श्रद्धा आणि आफताबने जुलै २०२० मध्ये वसईच्या एव्हरशाईन परिसरात रिगल अपार्टमेंटमध्ये पुन्हा पती-पत्नी असल्याचे सांगून सदनिका भाड्याने घेतली होती. याच कालावधीमधील हे चॅट आहेत.

  • 32/33

    या सदनिकेचा करार ऑगस्ट २०२१ मध्ये संपला या नंतर त्याने वसईत आणखी एका ठिकाणी रूम घेतली आणि त्यानंतर तो दिल्लीत राहायला गेला होता. १८ मे रोजी आफताबने लग्न करण्याच्या वादातून गळा आवळून श्रद्धाची हत्या केली होती.

  • 33/33

    सध्या हे स्क्रीनशॉट श्रद्धाला मागील दोन वर्षांपासून सातत्याने आफताबकडून मारहाण होत होती हे दर्शवणारे असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात डिजीटल माध्यमातून अधिक माहिती आणि डेटा गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणाबद्दल अधिक धक्कादायक खुलासे समोर येतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय.

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsदिल्लीDelhiदिल्ली हत्याकांडDelhi Murder

Web Title: Shraddha walkar murder case victim whatsapp instagram chat photo of face with injuries to manager screenshot as evidence of relationship scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.