• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ncp pune agitation against governor bhagatsingh koshyari over shivaji maharaj statement in pune ssa

Photos : ‘काळी टोपी काळे मन, हेच भाजपचे अंतरमन’ म्हणत राष्ट्रवादीने फेडलं डमी राज्यपालांचं धोतर

“छत्रपती शिवाजी महाराज तसेच थोर व्यक्तींवर वारंवार…”, असे प्रशांत जगताप म्हणाले.

November 21, 2022 20:57 IST
Follow Us
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
    1/9

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

  • 2/9

    छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं होतं.

  • 3/9

    यानंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काही मराठा संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेध व्यक्त करत हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

  • 4/9

    तसेच, भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. पुण्यातील सारसबाग परिसरातल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं.

  • 5/9

    या आंदोलनादरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या वेषभूषामध्ये एक तरुण सहभागी झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धोतर फेडून निषेध व्यक्त केला.

  • 6/9

    ‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी, काळी टोपी काळे मन हेच भाजपचे अंतरमन, भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो,’ अशा घोषणा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

  • 7/9

    राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते.

  • 8/9

    परंतु, विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत.

  • 9/9

    छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून ते त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा राबवित आहेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.

TOPICS
भगतसिंह कोश्यारीBhagatsingh Koshyariराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Ncp pune agitation against governor bhagatsingh koshyari over shivaji maharaj statement in pune ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.