Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. girish mahajan comment on nikhil khadse death eknath khadse allegation prd

एकनाथ खडसेंचे महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले “गेस्ट हाऊसवरील भानगड…”

भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात वाद पेटला आहे

Updated: November 22, 2022 19:07 IST
Follow Us
  • girish mahajan and eknath khadse
    1/12

    भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात वाद पेटला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे पूत्र निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • 2/12

    ‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली. मला जास्त बोलायला लावू नका,’ असे महाजन म्हणाले आहेत. याच कारणामुळे खडसेदेखील आक्रमक झाले आहेत. महाजनांच्या वक्तव्यामुळे माझे कुटुंबीय दुखावले आहे. मला फार वेदना झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

  • 3/12

    निखिल भाऊंचा मृत्यू झाला तेव्हा मी तेथे नव्हतो. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी फक्त रक्षा खडसे होत्या. त्यामुळे महाजनांनी जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ रक्षा खडसे यांच्यावर संशय आहे, असा होतो. आमच्या परिवारावर त्यांनी संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. – एकनाथ खडसे

  • 4/12

    गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आमच्या परिवाराला फार वेदना झाल्या. माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे. – एकनाथ खडसे

  • 5/12

    माझ्या मित्रपरिवारातून साधारण ६० ते ७० फोन आले आहेत. त्यांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा निषेध केला आहे.- एकनाथ खडसे

  • 6/12

    महाजनांवर टीका करताना फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये काय झाले होते, हे तेव्हा वर्तमानपत्रांत छापून आले होते. मात्र मी त्याचा कधीही उल्लेख केलेला नाही. महाजनांची कृत्यं मी डोळ्यांनी पाहिली आहेत, असे मोठे विधान खडसे यांनी केले आहे.

  • 7/12

    गिरीशची अनेक कृत्यं मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. अगदी फर्दापूरच्या गेस्ट हाऊसला झालेली भानगड तेव्हा वर्तमानपत्रांमध्येही आली होती. मी तेव्हा फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये होतो. – एकनाथ खडसे

  • 8/12

    मात्र मी कधीही त्याचा उल्लेख केला नाही. गिरीश महाजन यांचे किती लोकांशी प्रेमाचे संबंध आहेत, याचाही मी कधी उल्लेख केला नाही. प्रेमाचे नाते असू शकते.- एकनाथ खडसे

  • 9/12

    अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते. गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत मी कधीही बोललो नाही.- एकनाथ खडसे

  • 10/12

    तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत.- एकनाथ खडसे

  • 11/12

    तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो.- एकनाथ खडसे

  • 12/12

    गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो, हेच यातून दिसते. हा सत्तेचा माज आहे. सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही.- एकनाथ खडसे

TOPICS
एकनाथ खडसेEknath Khadseगिरीश महाजनGirish Mahajan

Web Title: Girish mahajan comment on nikhil khadse death eknath khadse allegation prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.