Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar tell list of singer sadhana sargam songs in amravati rno news pbs

“सात समुंदर मैं तेरे पिछे पिछे आ गयी हे गाणंही…”; अजित पवारांच्या स्वत:बद्दलच्या विधानानंतर पिकला एकच हशा

अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांनी अशी टोलेबाजी केली की साधना सरगम यांच्यासह अनेकांना हसू अनावर झालं. त्याचाच हा आढावा…

Updated: December 24, 2022 20:41 IST
Follow Us
  • राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणजे कडक शिस्तीचे आणि गंभीर स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जातात.
    1/24

    राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणजे कडक शिस्तीचे आणि गंभीर स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जातात.

  • 2/24

    मात्र, शनिवारी (२४ डिसेंबर) अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात त्याचं वेगळं रुपही अनुभवायला मिळालं.

  • 3/24

    या कार्यक्रमात अजित पवार यांनी प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच जोरदार टोलेबाजी केली.

  • 4/24

    पवारांनी साधना सरगम यांचं कौतुक करताना केलेल्या वर्णनातून ते गाण्यांचे किती मोठे चाहते आहेत हे समोर आलं.

  • 5/24

    इतकंच नाही तर अजित पवारांनी या कार्यक्रमात चित्रपटाच्या नावासह साधना सरगम यांच्या गाण्यांची यादीच वाचून दाखवली आणि त्यांच्या दुसऱ्या स्वभावाचीही झलक दाखवली.

  • 6/24

    या कार्यक्रमात अजित पवारांनी अशी टोलेबाजी केली की साधना सरगम यांच्यासह अनेकांना हसू अनावर झालं. त्याचाच हा आढावा…

  • 7/24

    आम्ही लोकं राजकीय क्षेत्रातील आहोत. मी आणि आमदार प्रवीण पोटे वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. तेव्हा सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी एक गाणं म्हणून दाखवलं. तसेच त्यांची चित्रफितही दाखवली – अजित पवार

  • 8/24

    गाणं ऐकल्यावर प्रवीण पोटेंना कळलं की, एवढं लोकप्रिय गाणं साधना सरगम यांनी गायलं. त्यांनी मला विचारलं की, हे गाणं साधना सरगम यांनी गायलं आहे का? – अजित पवार

  • 9/24

    आम्ही नुसती गाणी ऐकतो. कोणी गायलं, काय गायलं काही घेणंदेणं नाही. कानाला चांगलं वाटलं की ऐकायचं. परंतू सगळेच तसे नसतात – अजित पवार

  • 10/24

    आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका साधना सरगम यांनी दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या गोड, सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः भूरळ घातली – अजित पवार

  • 11/24

    गाणसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींच्या काळात बॉलिवूडवर दोन दशकं भूरळ घालण्याचं काम साधंसोपं नव्हतं – अजित पवार

  • 12/24

    कारण या दोघी बहिणींसमोर कोणालाही उभं केलं तर लोक ते मान्य करतील की नाही असं प्रत्येक संगीतकाराला वाटायचं – अजित पवार

  • 13/24

    परंतु, आमच्या महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्य असणाऱ्या रत्नागिरीत जन्माला आलेल्या आमच्या भगिनीने अशा पद्धतीने सुंदर प्रकारची गाणी गायली – अजित पवार

  • 14/24

    आजही साधना सरगम यांची गाणी पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा ऐकली तरी पुन्हा ऐकावीशी वाटतात – अजित पवार

  • 15/24

    ‘जो जिता वही सिकंदर’मधील ‘पहिला नशा’ हे गाणं पाहिलं, जालबाजमधील डिंपल कपाडियावर चित्रित करण्यात आलेलं ‘हर किसी को नही मिलता प्यार जिंदगी में’ गाणं अतिशय सुंदर गायलं आहे – अजित पवार

  • 16/24

    ‘विश्वात्मा’मधील ‘सात समुंदर मैं तेरे पिछे पिछे आ गयी’ हे गाणंही तुम्ही पाहिलं. ‘दिवाना’मधील ‘तेरी उम्मीद, तेरा इंतजार’ गाणंही मधुर आहे – अजित पवार

  • 17/24
  • 18/24

    तुम्हाला माझं दुसरं अंग माहिती नाही. तुम्ही माझं एकच अंग बघता आणि मला टोचत असता – अजित पवार

  • 19/24

    अजित पवार असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

  • 20/24

    यानंतर ते म्हणाले, “गंमतीचा भाग जाऊ द्या, पण आई वडिलांच्या आयुष्यात जन्माला आल्यावर तुमचं माझं जग खूप सुंदर आहे. त्याचा कसा आनंद घ्यायचा हे प्रत्येकावर अवलंबून असतं.”

  • 21/24

    अजित पवारांनी स्वतःवरच मिश्किल टिपण्णी केल्यानंतर गायिका साधना सरगम यांच्यासह सर्वांनाच हसू अनावर झाले होते.

  • 22/24

    यावेळी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरही उपस्थित होत्या.

  • 23/24

    या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

  • 24/24

    अजित पवारांच्या या भाषणाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. (सर्व फोटो – सौजन्य आरएनओ)

TOPICS
अजित पवारAjit PawarअमरावतीAmravatiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Ajit pawar tell list of singer sadhana sargam songs in amravati rno news pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.