• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sambhajiraje chhatrapati tell a incident about father wife sanyogitaraje after marriage pbs

Photos : “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण…”, संभाजीराजेंनी सांगितला पत्नी संयोगिताराजेंचा ‘तो’ किस्सा

संभाजीराजेंनी शनिवारी (७ जानेवारी) केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

Updated: January 7, 2023 23:42 IST
Follow Us
  • माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
    1/39

    माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

  • 2/39

    यात त्यांनी पत्नी संयोगिताराजे आणि मुलगा शहाजी यांच्या आणि वडिलांच्याआठवणीही सांगितल्या.

  • 3/39

    संभाजीराजेंनी शनिवारी (७ जानेवारी) केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

  • 4/39

    आदरणीय बाबा, ‘महाराज’. श्री शाहू छत्रपती महाराजांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांविषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 5/39

    छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणूनही तितकेच संवेदनशील आहेत – संभाजीराजे छत्रपती

  • 6/39

    लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली – संभाजीराजे छत्रपती

  • 7/39

    राजघराण्यात जन्माला आल्यामुळे समाजात जो मानसन्मान किंवा विशेष वागणूक मिळते, त्यापासून त्यांनी आम्हाला कटाक्षाने लांब ठेवले – संभाजीराजे छत्रपती

  • 8/39

    लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा – संभाजीराजे छत्रपती

  • 9/39

    बाबांनी आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी नेहमी घेतली – संभाजीराजे छत्रपती

  • 10/39

    शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठविण्यात आले होते. याच शाळेमध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिक्षण घेतले होते – संभाजीराजे छत्रपती

  • 11/39

    कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, बाबा सुट्टी संपल्यावर मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे – संभाजीराजे छत्रपती

  • 12/39

    शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची. शाळेच्या गेटवर बाबा मला मिठी मारायचे, डोळ्यातून अश्रू यायचे – संभाजीराजे छत्रपती

  • 13/39

    राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेजच्या गेटवर मारलेल्या मिठीत होती – संभाजीराजे छत्रपती

  • 14/39
  • 15/39

    लग्न झाले त्यावेळेची आठवण सांगताना संयोगिताराजे सांगतात, “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण बाबांनी मला खूप समजावून घेतले.” – संभाजीराजे छत्रपती

  • 16/39

    “मी आपणास बाबा म्हणू का ? असे विचारले असता, माझी दोन्ही मुलं मला बाबा म्हणतात, तुम्हीपण मला बाबाच म्हणा, असे बाबांनी सांगितले” – संभाजीराजे छत्रपती

  • 17/39

    “किती प्रेम, किती आपुलकी, बाबांनी खूप लाड केले. बाबांनी मला नेहमीच मुलीसारखे वागवले” – संभाजीराजे छत्रपती

  • 18/39

    तारा कमांडो फोर्सच्या बियासकुंड ट्रेकला बाबांबरोबर संयोगिताराजे गेल्या असता, तिथला एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 19/39

    रात्रीच्या वेळी कँपवर असताना, अचानकपणे वादळ व जोराचा पाऊस सुरू झाला. अनेकांच्या टेंटमध्ये पाणी येवू लागले. बाबांना काळजी वाटू लागली – संभाजीराजे छत्रपती

  • 20/39

    संयोगिताराजेंना शोधत बाबा स्वतः पावसात कंदील घेऊन आले. सर्व सुखरूप असल्याची खात्री करून पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेले – संभाजीराजे छत्रपती

  • 21/39

    कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन कसे करायचे, हे बाबांकडूनच शिकण्यासारखे आहे, असे संयोगिताराजे नेहमी म्हणत असतात – संभाजीराजे छत्रपती

  • 22/39

    चिरंजीव शहाजी लहान असताना बाबा व शहाजी अनेकवेळा कुशीरे ते जोतिबा ट्रेकला जात असत. घोडेस्वारी, व्यायाम, पोहणे यासाठी बाबा नेहमी शहाजींना प्रोत्साहन देत – संभाजीराजे छत्रपती

  • 23/39

    शहाजी बाबांविषयी बोलताना म्हणतात, “आबांशी चर्चा करताना प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून जावे लागते. कोणत्याही गोष्टीचा खोलवर अभ्यास करून ते निर्णय घेत असतात” – संभाजीराजे छत्रपती

  • 24/39

    “आबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे, त्यामुळे आबांचा विवेक कायम जागृत असतो. आबांचा हा गुण मला सदैव प्रेरणा देणारा आहे” – संभाजीराजे छत्रपती

  • 25/39

    इतिहास हा बाबांचा आवडता विषय आहे, मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच त्यांनी इतिहास संशोधन मंडळास प्रोत्साहन देऊन मराठा इतिहास लेखन चळवळ पुढे चालू ठेवली. यातून अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 26/39

    राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शैक्षणिक कार्यात केलेल्या कार्याचा वसा घेऊन सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबांनी छत्रपती शाहू विद्यालयाची स्थापना केली – संभाजीराजे छत्रपती

  • 27/39

    इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषा सक्ती बाबांनी केली, कारण मातृभाषा अवगत असल्याशिवाय मातृभूमीशी नाळ जोडली जात नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 28/39

    साहसी वृत्ती समाजामध्ये रूजावी या उद्देशाने करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या नावाने तारा कमांडो फोर्स (T.C.F.) ची स्थापना केली आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 29/39

    बाबा क्रीडाप्रेमी आहेत. कुस्ती आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. आणि हेच संस्कार माझ्यात व शहाजींमध्ये आलेले आहेत. नवीन राजवाड्याच्या लाल आखाड्यातील माती अंगाला लागली – संभाजीराजे छत्रपती

  • 30/39

    कुस्ती बरोबरच फुटबॉल, क्रिकेट, घोडेस्वारी, स्विमिंग याची आवड बाबांमुळे निर्माण झाली. बाबा स्वत: शाळेवरील टाकीत मला पोहायला शिकवायचे. यातूनच माझ्यात खेळाडूवृत्ती आणि धाडसीपणा निर्माण झाला – संभाजीराजे छत्रपती

  • 31/39

    बाबा, त्यांचे वडील मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच कडक शिस्तीचे आहेत. माझ्यात जी काही शिस्त आहे ती बाबांमुळेच आणि शांत स्वभाव आईंमुळे आहे – संभाजीराजे छत्रपती

  • 32/39

    बाबांच्या अनेक छंदापैकी एक छंद म्हणजे प्रवास व पर्यटन. प्रवास व पर्यटनामुळे माणसाच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. जगाचा परिचय होतो. वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होते – संभाजीराजे छत्रपती

  • 33/39

    माणूस परिपूर्ण प्रवासामुळे होतो, असा बाबांचा पक्का विश्वास आहे. बाबांच्या प्रेरणेमुळेच मी, संयोगिताराजे व शहाजी अनेक स्थळी पर्यटन करून त्या ठिकाणचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत असतो – संभाजीराजे छत्रपती

  • 34/39

    बाबा शेतीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. बाबांच्या मते शेतीमध्ये वेळेला फार महत्व असते. वेळेचे गणित ज्या शेतकऱ्याला समजते तोच खरा शेतकरी – संभाजीराजे छत्रपती

  • 35/39

    शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व सर्व क्षेत्रात करावा यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असतो – संभाजीराजे छत्रपती

  • 36/39

    बाबांच्या जीवनात स्वच्छतेला व पर्यावरणाला महत्वाचे स्थान आहे. संयोगिताराजे व शहाजी यांना पर्यावरणाची आवड बाबांमुळेच लागली – संभाजीराजे छत्रपती

  • 37/39

    बाबांनी आम्हाला सर्व कामांमध्ये परिपूर्ण बनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची वृत्ती माझ्यात निर्माण झाली. आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते – संभाजीराजे छत्रपती

  • 38/39

    माझ्या मनात बाबांविषयी नेहमी आदराचेच स्थान आहे. बाबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, मनःशांती आणि आनंद मिळो हीच प्रार्थना! आम्ही आपल्या छत्रछायेखाली राहो आणि आपले मार्गदर्शन सतत राहो हीच सदिच्छा! – संभाजीराजे छत्रपती

  • 39/39

    आम्हा तिघांच्या अंत:करणात बाबांचे स्थान असीम आहे. बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर एकच शब्द येतो, तो म्हणजे ‘Awe’ (Respect with Reverential Fear) म्हणजे आदरयुक्त भिती! – संभाजीराजे छत्रपती (सर्व छायाचित्र – संभाजीराजे फेसबूक पेज)

TOPICS
कोल्हापूर
Kolhapur
छत्रपती संभाजीराजे
Chhatrapati Sambhajiraje

Web Title: Sambhajiraje chhatrapati tell a incident about father wife sanyogitaraje after marriage pbs

IndianExpress
  • ‘Very big one’: Donald Trump hints at trade deal with India after China pact
  • Need to discuss if socialist, secular should remain in Preamble: RSS Gen Secy Dattatreya Hosabale
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Think of how an old post may be problematic, then delete it’: New US Visa rule fuels student anxiety over social media
  • Revision of Bihar electoral rolls: Why, how
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.