-
‘एमव्ही गंगा विलास’ ही जगातील सर्वात लांब नदी क्रूझ प्रवासासाठी सज्ज आहे.
-
शुक्रवारी म्हणजे १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या क्रूझचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल.
-
ही क्रूझ ५१ दिवसांत ३२ प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार २०० किमीचा प्रवास करणार आहे.
-
याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल.
-
दरम्यान, या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.
-
तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे.
-
याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या क्रूझचे एका दिवसाचे भाडे ५० हजार रुपये आहे.
-
‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करेन.
-
दरम्यान, १३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.
बार, स्पा अन् रेस्टॉरंट; जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ आतून कशी आहे? पाहा PHOTOS
‘एमव्ही गंगा विलास’ ही जगातील सर्वात लांब नदी क्रूझ प्रवासासाठी सज्ज आहे. शुक्रवारी म्हणजे १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या क्रूझचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे.
Web Title: Pm narendra modi will flag off worlds longest river luxury cruise mv ganga vilas inside view spb