• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sikander sheikh on maharashtra kesari panch threat phone ssa

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकीचा फोन; सिकंदर शेख म्हणाला, “फक्त…”

“…तर महाराष्ट्र केसरी झालो असतो”

Updated: January 17, 2023 13:19 IST
Follow Us
  • महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला होता.
    1/9

    महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला होता.

  • 2/9

    या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर मात केली होती. मात्र, पंच मारुती सातव यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदरला बाहेर पडावं लागलं असल्याची चर्चा समाज माध्यमांत आहे.

  • 3/9

    यानंतर पंच मारुती सातव यांना धमकीचा फोन गेला आहे. याप्रकरणी मारूती सातव यांनी गुन्हाही दाखल केला आहे. यावर सिकंदर शेखने भाष्य केलं आहे.

  • 4/9

    “संग्राम कांबळे हे पहिल्यापासून गंगावेश तालमीचे फेसबुक अकाउंट चालवत आहे. त्यांना कुठेतरी वाईट दिसलं, म्हणून ते बोलले आहेत.”

  • 5/9

    “सगळीकडे रेकॉर्डिग व्हायरल झालं आहे. कोणतीही धमकी देण्यात आली नाही. फक्त तुम्ही असं का केलं ही विचारणा केली आहे,” असं स्पष्टीकरण सिकंदर शेखने दिलं आहे.

  • 6/9

    तसेच, “उपांत्य कुस्तीत टांग ( पूर्ण पाठीवर पडणे ) लागली होती, तिथे व्यवस्थित टांग बसली नाही.”

  • 7/9

    “एका खांद्यावर मी पडलो असून, त्याला ( महेंद्र गायकवाड ) दोन तर मला एक गुण द्यायला पाहिजे होता. असं ४-३ ने कुस्ती चालायला हवी होती. पण, दोनऐवजी ४ गुण समोर पैलवानला देण्यात आलं,” असं सिकंदर शेख म्हणाला.

  • 8/9

    “माझा ताबा असतानाही समोरील पैलवानाला ४ गुणे देणं चुकीचं आहे. सामन्याचे समोरील बाजूचे व्हिडीओ दाखवण्यात आलं. पण, पाठीमागील बाजूचं काहीच दाखवलं गेलं नाही.”

  • 9/9

    “स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करुन गेलो होतं. यंदा मी महाराष्ट्र केसरी झालो असतो,” असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.

TOPICS
कोल्हापूरKolhapurमहाराष्ट्र केसरीMaharashtra Kesariस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Sikander sheikh on maharashtra kesari panch threat phone ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.