• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. republic day 2023 pared indian army navy and airforce presentation at kartvyapath new delhi spb

Republic Day 2023: जगाने अनुभवलं भारताचं सामर्थ्य; ‘कर्तव्यपथा’वर सैन्य दलांकडून चित्तथरारक सादरीकरण; पाहा PHOTOS

आज देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.

Updated: January 26, 2023 15:56 IST
Follow Us
  • आज देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
    1/12

    आज देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 2/12

    यावेळी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रांचे प्रदर्शन आणि चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.

  • 3/12

    दिल्लीतील कर्तव्य पथावर आज तिन्ही सैन्य दलाच्या विविध तुकड्यांनी आपापलं कसब दाखवलं.

  • 4/12

    यावेळी कॅप्टन सुनील दशरथे यांच्या नेतृत्वाखालील ‘अमृतसर एअरफील्ड’ आणि ‘५१२ लाइट एडी मिसाइल रेजिमेंट’चे लेफ्टनंट चेतन शर्मा यांनी २७ एअर डिफेन्स मिसाइल रेजिमेंटची ‘आकाश’ या शस्त्र प्रणालीसह सादरीकरण केले.

  • 5/12

    लेफ्टनंट प्रज्ज्वल काला यांच्या नेतृत्वाखाली ८६१ क्षेपणास्त्र रेजिमेंटने ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रासह कर्तव्यपथावरील पथसंचलनात सहभाग घेतला.

  • 6/12

    आज झालेल्या पथसंचलनादरम्यान कर्तव्य पथावर K9-Vajra-T क्षेपणास्त्र प्रणालीचेही सादरीकरण सैन्य दलाकडून करण्यात आले.

  • 7/12

    ३ लडाख स्काउट्स रेजिमेंटचे कॅप्टन नवीन धत्तेरवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल’च्या तुकडीनेही कर्तव्यपथावरून संचलन केले.

  • 8/12

    लेफ्टनंट सिद्धार्थ त्यागी यांच्या नेतृत्वाखाली १७ इन्फंट्री रेजिमेंटच्या ‘नाग’ क्षेपणास्त्र प्रणालीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

  • 9/12

    ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वायू दलाच्या विमानांनी केलेल्या चित्तथरारक सादरीकरणाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 10/12

    यावेळी तीन मिग २९ मल्टीरोल फायटरचे ‘बाज फॉर्मेशन’ही अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

  • 11/12

    मिग २९ च्या ‘बाज फॉर्मेशन’ बरोबरच ‘६ जग्वार डीप पेनिट्रेशन स्ट्राइक एअरक्राफ्ट’च्या ‘अमृत फॉर्मेशन’नेही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला.

  • 12/12

    याबरोबरच चार ‘राफेल मल्टी रोल फायटर’ विमानांनीही यावेळी चित्तथरारक सादरीकरण केले.

  • फोटो सौजन्य – एएनआय वृत्तसंस्था
TOPICS
दिल्लीDelhiप्रजासत्ताक दिन परेडRepublic Day Paradeप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025भारताचा प्रजासत्ताक दिनIndias Republic Day

Web Title: Republic day 2023 pared indian army navy and airforce presentation at kartvyapath new delhi spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.