• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos five earthquake at turkey in two days death over five thousand spb

PHOTOS : दोन दिवसांत पाच भूकंप, पाच हजार नागरिकांचा मृत्यू अन् शेकडो इमारती जमीनदोस्त; टर्कीतील मन हेलावून टाकणारी दृश्यं

टर्की एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे हादरले आहेत.

February 7, 2023 17:08 IST
Follow Us
  • Turkey Syria Earthquake
    1/24

    टर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे हादरले आहेत.

  • 2/24

    टर्कीत सोमवारी तीन मोठे भूंकप झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले.

  • 3/24

    या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या.

  • 4/24

    या घटनेत आत्तापर्यंत पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून १५ हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत.

  • 5/24

    आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त जणांचा शोध घेण्यात आला असून आठ हजारांपेक्षा जास्त जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.

  • 6/24

    याचबरोबर तीन लाखांपेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिली.

  • 7/24

    दरम्यान, सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते.

  • 8/24

    या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती.

  • 9/24

    युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते.

  • 10/24

    तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

  • 11/24

    सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

  • 12/24

    दोन भूकंपाचे धक्का बसल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा टर्कीत भूकंपाचा धक्का बसला.

  • 13/24

    या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

  • 14/24

    सोमवारी तीन भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला.

  • 15/24

    या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून अंकारा प्रांतातील गोलबासी शहरात हा भूकंप झाला आहे.

  • 16/24

    तर पाचवा भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून यामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे.

  • 17/24

    दरम्यान, या संकट काळात भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.

  • 18/24

    भारतातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) शोध आणि बचाव पथकाची पहिली तुकडी टर्कीमध्ये पोहोचली आहे.

  • 19/24

    या तुकडीत एनडीआरएफच्या जवानांसोबत विशेष प्रशिक्षित श्वान पथकं आहे.

  • 20/24

    या बरोबरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीमध्ये वैद्यकीय पथकही आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

  • 21/24

    भारत टर्कीतील लोकांच्या पाठीशी उभा आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 22/24

    विनाशकारी भूकंपाचा सीरियावरही परिणाम झाला आहे. हे जाणून खूप दुःख झालं आहे, असेही ते म्हणाले.

  • 23/24

    पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

  • 24/24

    दरम्यान, टर्कीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

  • फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस, एएनआय वृत्तसंस्था, सोशल मीडिया
TOPICS
तुर्कस्तानTurkeyभूकंपEarthquake

Web Title: Photos five earthquake at turkey in two days death over five thousand spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.