Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jitendra awhad on shivsena and bjp offer gopinath munde uddhav thackeray milind narvekar ssa

“उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांमार्फत फोन केला अन्…”, जितेंद्र आव्हाडांनी केला गौप्यस्फोट

“पत्नीने कळवल्यानंतरही गोपीनाथ मुंडेंनी कधीच माझ्यावर…”

February 6, 2023 19:11 IST
Follow Us
  • ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांना कोणत्या कोणत्या पक्षांची ऑफर होती, याबद्दल सांगत पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
    1/9

    ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांना कोणत्या कोणत्या पक्षांची ऑफर होती, याबद्दल सांगत पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

  • 2/9

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, “स्वर्गीय आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर रघुनाथ मोरे हे जिल्हाप्रमुख झाले होते. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात आमच्या संघर्ष संस्थेच्या कार्यालयात देवीदास चाळके बसले होते.”

  • 3/9

    “तेव्हा फोन आला आणि मिलिंद नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची ऑफर दिली होती.”

  • 4/9

    “तसेच, विचार करून सांग असं मिलिंद नार्वेकरांनी म्हटलं होतं. पण, मिलिंद नार्वेकर मित्र असल्याने त्यांना सांगितलं, की विचार करण्यासारखं काहीचं नाही.”

  • 5/9

    “मी शरद पवारांना सोडणार नाही,” असं सांगितल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 6/9

    “एके दिवशी गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी म्हटलं, मी आणि प्रमोद महाजन यांनी चर्चा केली; तुला भाजपातर्फे आमदार करायचं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंशीही बोलणार आहे.”

  • 7/9

    “पण तू घरी चर्चा करुन मला कळव. त्यानंतर पत्नीशी चर्चा केली. पत्नीला सांगितलं की, तूच त्यांना सांग मी शरद पवारांना सोडणार नाही. त्याला काही मिळालं, नाही मिळालं तरी चालेल.”

  • 8/9

    “हे पत्नीने कळवल्यानंतरही गोपीनाथ मुंडेंनी कधीच माझ्यावर माझ्यावर राग ठेवला नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 9/9

    “शरद पवारांनी २०१४ आणि २०१९ साली मंत्री केलं. जेव्हा जेव्हा राजकीय संकट आलं, तेव्हा माझ्यामागे शरद पवार उभे राहिले,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayजितेंद्र आव्हाडJitendra Awhad

Web Title: Jitendra awhad on shivsena and bjp offer gopinath munde uddhav thackeray milind narvekar ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.