-

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.
-
या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याच्या प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आला. तसेच, महिला आणि शेतकऱ्यांसाठीही या अर्थसंकल्पाद्वारे अनेक महत्त्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
-
यावेळी बोलताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली. तसेच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचेही ते म्हणाले.
-
पुढे बोलताना ”कालच, महिला दिन साजरा करण्यात आला. देशीच प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
-
लैंगिक शोषण प्रकरणातून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
-
या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आदी सेवा पुरवण्यात येईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
अंगणवाडी सेविकांबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरुन १० हजार रुपये करण्यात येईल. तसेच मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरुन ७२०० रुपये करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
-
याबरोबरच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४३५ वरुन ५५०० रुपये करण्यात येईल आणि अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार, अशी माहितीही त्यांनी दिली.
-
आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरुन पाच हजार रुपये करण्यात येईल. तसेच गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० वरुन ६२०० रुपये करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
-
महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर तयार करण्यात येईल. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तयार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
-
मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांदर्गत महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचारसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
PHOTOS : बसच्या तिकीटात ५० टक्के सवलत ते अंगणवाडी सेविकांचं मानधन; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतुदी? वाचा…
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.
Web Title: 50 percent discount for women in st bus ticket to anganwadi sevika mandhan announcement by devendra fadnavis in maharashtra budget 2023 spb