• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sant tukaram bij sohala at dehu in presence of devotees pune see photos mrj

Photos: देहूत संत तुकाराम बीज सोहळा उत्साहात, लाखो भाविकांची उपस्थिती

या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते

March 9, 2023 18:08 IST
Follow Us
  • sant tukaram bij sohala
    1/12

    जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा गुरुवारी ९ मार्च मोठ्या आंनदात देहूमध्ये पार पडला.

  • 2/12

    तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते.

  • 3/12

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले.

  • 4/12

    त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचे बीज सोहळ्याचे ३७५ वर्षे आहे.

  • 5/12

    पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली.

  • 6/12

    पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली.

  • 7/12

    पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली.

  • 8/12

    पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.

  • 9/12

    सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले.

  • 10/12

    त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले.

  • 11/12

    दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला.

  • 12/12

    नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

TOPICS
पुणे न्यूजPune Newsसंत तुकारामSant Tukaram

Web Title: Sant tukaram bij sohala at dehu in presence of devotees pune see photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.