-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत प्रभू श्री राम यांचे दर्शन घेतले आहे.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं मोठ्या जल्लोषात अयोध्येत स्वागत करण्यात आले.
-
तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शनेही केले आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र भगवे वातावरण झाले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
-
सर्वजण अतिशय खुश आणि आनंदी आहेत.
-
तसेच, जंगी स्वागत केल्याबद्दल अयोध्येतील जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
-
सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राम जन्मभूमित उत्साह असतोच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
हा उत्साह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आल्याचा उत्साह असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
अयोध्येत रामलल्लांचे दर्शन ते मंदिर बांधकाम पाहणी, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे पाहा Photos
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत मोठ्या स्वरूपात शक्तीप्रदर्शन केले.
Web Title: Eknath shinde and devendra fadnvais ayodhya tour all photos see ssa