• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ncp leader ajit pawar talk about india population said girls should treat equally photos kak

“अपत्य जन्माला घालणं देवाची नव्हे तर नवरा-बायकोची…” लोकसंख्यावाढीवरुन अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, म्हणाले “लेकच बापाचे…”

लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

April 21, 2023 20:33 IST
Follow Us
  • ajit-pawar-on-india-population
    1/15

    गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत.

  • 2/15

    अजित पवारांनी नुकतीच ‘सकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणाव्यतिरिक्तही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • 3/15

    या मुलाखतीत त्यांनी भारताच्या लोकसंख्येवरुनही त्यांचं मत मांडलं.

  • 4/15

    अजित पवार म्हणाले, “लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनला मागे टाकलं आहे. १९४७ साली भारताची लोकसंख्या ३२-३५ कोटी होती.”

  • 5/15

    “आता २०२३मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश असा आपला नावलौकीक झाला आहे.”

  • 6/15

    “आता कठोर निर्णय घेतले गेले पाहिजेत. किती अपत्य जन्माला घालावीत हे कोणत्याही जातीत, धर्मात किंवा पंथात सांगितलेलं नाही.”

  • 7/15

    “अपत्य परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते. ही नवरा-बायकोची कृपा असते. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे,” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.

  • 8/15

    पुढे ते म्हणाले, “मुलीलाही तेवढाच अधिकार आणि मानसन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी काही बिघडत नाही.”

  • 9/15

    “लेकच बापाचं नाव काढते. मुलगा नाव नाही काढत. मुलगा नाव घालवतो.”

  • 10/15

    “संजय गांधी आता नाहीत पण १९७५ सालातील कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता.”

  • 11/15

    “तर आज लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते कमी झालं असतं.”

  • 12/15

    “सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे. पण तरुणांची संख्या किती असावी, यावर मर्यादा पाहिजे. यामुळे पुढच्या पिढीचं नुकसान होता कामा नये.”

  • 13/15

    “याबाबत आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करुन कठोर निर्णय घेतला गेला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.

  • 14/15

    (सर्व फोटो : अजित पवार/ फेसबुक)

  • 15/15

    (हेही वाचा>>राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटेच का दिसतात? रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…)

TOPICS
अजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसंख्याPopulation

Web Title: Ncp leader ajit pawar talk about india population said girls should treat equally photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.