• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pune g20 guest visited shaniwar wada lal mahal heritage walk historical knowledge pune print news ccp 14 sdn

Pune G20 Photos: परदेशी पाहुण्यांनी दिली पुण्यातील वारसास्थळांना भेट; जाणून घेतला इतिहास

शनिवारवाड्यापासून या वारसा स्थळ भेटीची सुरूवात झाली.

Updated: June 20, 2023 11:39 IST
Follow Us
  • Pune G20 Photos
    1/15

    पुणे : जी-२० बैठकीसाठी आलेल्या विविध देशांतील प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.

  • 2/15

    परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती.

  • 3/15

    शनिवारवाडा, लाल महालाचा इतिहास जाणून घेतल्यावर परदेशी पाहुणे स्तिमित झाले.

  • 4/15

    शनिवारवाड्यापासून या वारसा स्थळ भेटीची सुरूवात झाली.

  • 5/15

    शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

  • 6/15

    लाल महल येथे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

  • 7/15

    भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

  • 8/15

    शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे, संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले.

  • 9/15

    गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखून दाखवली.

  • 10/15

    पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली.

  • 11/15

    या वेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला.

  • 12/15

    पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या.

  • 13/15

    अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली.

  • 14/15

    महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

  • 15/15

    ही वारसासहल आयोजित केल्याबद्दल परदेशी पाहुण्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

TOPICS
पुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pune g20 guest visited shaniwar wada lal mahal heritage walk historical knowledge pune print news ccp 14 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.