-
गेल्या काही दिवसांपासून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वाद सुरु आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राजांना फटकारलं आहे.
-
“आम्ही जेव्हा तुमच्याविरोधात काही बोललं, तर तो छत्रपतींच्या गादीचा अपमान होतो. मग तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा गादीचा अपमान नसतो का?,” असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
-
“आम्ही जेव्हा एखादी टीका-टिप्पणी करतो, तेव्हा तो गादीचा अपमान ठरतो. तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे काढता, तेव्हा तो गादीचा अपमान ठरत नाही का?”
-
“दोन्ही राजे साताऱ्याच्या रस्त्यावर येऊन भांडतात. तेव्हा आम्हालाही वाटते हा गादीचा अपमान होतो. दोन्ही राजे ज्या पद्धतीने एकमेकांवर धावून जात आहेत. आता फक्त तलवारीच काढायचं बाकी आहे. हा गादीचा अपमान नाही का? आपण काय करत आहोत हे दोघांनी बसून ठरवलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
-
विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “नेतृत्व जनता करणार आहे. सत्ताधाऱ्यांना कशाला चिंता पाहिजे? कोण पंतप्रधान? कोण नेता? हे आम्ही आधी निवडणुका जिंकू, मग ठरवू.”
-
“या देशात जनतेला नेता नकोय. देशात सुरु असलेला दहशतवाद संपवा, असं लोक म्हणत आहेत,” असेही संजय राऊतांनी सांगितलं.
“आम्ही तुमच्याविरोधात बोललं तर गादीचा अपमान, मग तुम्ही…”, संजय राऊतांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना फटकारलं
“दोन राजे ज्या पद्धतीने एकमेकांवर धावून जात आहेत, आता फक्त…,” असेही संजय राऊत म्हणाले.
Web Title: Sanjay raut slams udayanraje bhosale and shivendraraje bhosale ssa