-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.
-
शरद पवारांनी कोणत्याही नेत्याचा थेट उल्लेख न करता कुणीतरी असं म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली.
-
ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) बीडमधील स्वाभिमान सभेत बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
बीडमधील नेत्यांना काय झालं मला माहिती नाही – शरद पवार
-
एक कुणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून केला असं एका नेत्याने सांगितलं. कालपर्यंत ठीक होता, काय झालं म्हणून चौकशी केली – शरद पवार
-
तेव्हा समजलं की, त्यांनी कुणीतरी सांगितलं की, शरद पवारांचं वय झालं आहे – शरद पवार
-
त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल, तर दुसरा नेता निवडला पाहिजे असं बोललं गेलं – शरद पवार
-
मला एवढंच सांगायचं आहे की, माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं आहे – शरद पवार
-
त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे या जिल्ह्यातील जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही एकदा दाखवून दिलं आहे – शरद पवार
-
इथल्या तरुण पीढीच्या मदतीने अनेकांचे पराभव इथं झाले आहेत – शरद पवार
-
माझं एकच सांगणं आहे की, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं असेल, तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, बरं झालं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा – शरद पवार
-
हे नाही केलं, तर लोक त्यांना योग्य प्रकारचा धडा देतील – शरद पवार
-
माझी तक्रार ही आहे, की मागील निवडणुकीत त्यांनी जनतेची मदत घेतली. लोकांनी निवडून दिलं आणि भाजपाचा पराभव केला – शरद पवार
-
भाजपाचा पराभव करून ते सत्तेत आले आणि आज त्यांनी भाजपाच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेतली – शरद पवार
-
ते आज हे करत आहेत, पण उद्या जेव्हा लोकांना मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळी कोणतं बटन दाबायचं आणि त्यांना कुठं पाठवायचं हा निर्णय या जिल्ह्यातील प्रत्येक मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही – शरद पवार (सर्व संग्रहित छायाचित्र)
“माझी तक्रार ही आहे की, मागील निवडणुकीत त्यांनी…”; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) बीडमधील स्वाभिमान सभेत बोलत होते.
Web Title: Sharad pawar criticize ajit pawar faction over rebel in ncp pbs