-
ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
-
अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येते.
-
अजित पवारांची शिंदे-फडणवीसांसमोर महामानवांवरील वादग्रस्त वक्तव्यांवर प्रतिक्रिया (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही. अजित पावर सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे.
-
शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
-
अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो.
-
शिंदे गटाच्या काही नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा केली होती. त्यानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
-
अजित पवार यांनी थेट सवाल केल्याने शिंदे यांना ते फारसे रुचले नसल्याची चर्चा शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आहे. अशा वेळी भाजपानेते आणि विशेषत: फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे.
-
अजित पवार यांना भाजपाबरोबर घेण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळेच शिंदे आणि पवार यांच्यात आणखी कटुता निर्माण झाल्यास भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
अजित पवारांचा ‘तो’ प्रश्न अन् एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी; नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो.
Web Title: Clash between ajit pawar and eknath shinde thane govt hospital death devendra fadnavis ssa