• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. last 22 seconds of chandrayaan 3 mission moon soft landing isro vikram lander pbs

Photos : चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताना शेवटच्या २२ सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा…

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. अखेर जगाने तो ऐतिहासिक क्षण पाहिला. या मोहिमेत शेवटचे २२ सेकंद फार महत्त्वाचे होते. तेव्हा नेमकं काय घडलं त्याचा आढावा…

Updated: August 23, 2023 20:03 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. अखेर जगाने तो ऐतिहासिक क्षण पाहिला. या मोहिमेत शेवटचे २२ सेकंद फार महत्त्वाचे होते. तेव्हा नेमकं काय घडलं त्याचा आढावा...
    1/24

    गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं.

  • 2/24

    चांद्रयान २ अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान ३ मोहिमेत यश मिळवण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि भारतीयांना तो ऐतिहासिक क्षण पाहता आला.

  • 3/24

    चांद्रयान मोहिमेत संध्याकाळी ५.४४ मिनिटांनी विक्रम लँडर आपली जागा घेतली.

  • 4/24

    चांद्रयान ३ च्या लँडरने २१ वेळा पृथ्वीची आणि चंद्राची १२० वेळा प्रदक्षिणा पूर्ण केली.

  • 5/24

    यात एकूण ५५ लाख किलोमीटरचा प्रवास झाला.

  • 6/24

    चांद्रयान चंद्रपासून २१ किमी अंतरावर असताना दीड किमी प्रति सेकंद अशा वेगाने यान फिरलं.

  • 7/24

    यानंतर त्याचा वेग आणखी कमी करण्यात आला.

  • 8/24

    चांद्रयानाचा वेग शून्य झाल्यानंतर शेवटची २२ सेकंद अत्यंत महत्त्वाची ठरली.

  • 9/24

    भारताचं हे चांद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं.

  • 10/24

    विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं.

  • 11/24

    विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर रँप उघडले आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आले.

  • 12/24

    यासह भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला.

  • 13/24

    अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता.

  • 14/24

    परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली.

  • 15/24

    त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती.

  • 16/24

    भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता.

  • 17/24

    आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले.

  • 18/24

    अनेक अडथळे पार करत भारताचं चांद्रयान आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे.

  • 19/24

    चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.

  • 20/24

    मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारतवासियांना संदेश देताना म्हणाले, “आपण आता चंद्रावर आहोत.”

  • 21/24

    चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे.

  • 22/24

    समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

  • 23/24

    हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेशी जोडलं गेलं होतं, असंही मोदींनी नमूद केलं.

  • 24/24

    (छायाचित्र सौजन्य – इस्रो)

TOPICS
इस्रोISROचंद्रMoonचांद्रयान ३chandrayaan 3

Web Title: Last 22 seconds of chandrayaan 3 mission moon soft landing isro vikram lander pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.