• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. isro chandrayaan 3 moon soft landing south pole why it is important india become first country detailed information sdn

Chandrayaan-3: दक्षिण ध्रुव भागातच ‘चांद्रयान-३’ का उतरले? जाणून घ्या सविस्तर

चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच.

Updated: August 24, 2023 10:36 IST
Follow Us
  • Chandrayaan-3 Landing South Pole Importance
    1/15

    बुधवारी सायंकाळी ६.०४ वाजता चांद्रयान-३च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केले आणि भारताने नवा इतिहास घडवला.

  • 2/15

    चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच.

  • 3/15

    चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक प्रचंड मोठी विवरे आहेत.

  • 4/15

    त्यामुळेच या भागात आतापर्यंत उतरणे एकाही देशाच्या यानाला शक्य झाले नव्हते. (Photo Source – Pawan K Goenka / Twitter)

  • 5/15

    दक्षिण ध्रुवावरील अजस्त्र विविरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.

  • 6/15

    या बर्फाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आणि तो बाहेर काढून वापरणे शक्य झाले, तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्याचा उपयोग करता येईल.

  • 7/15

    बर्फ वितळवून पिण्यासाठी तसेच उपकरणे थंड करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.

  • 8/15

    पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती करता येईल.

  • 9/15

    विक्रम लँडरवर बसविलेल्या ‘प्रग्यान’ या रोव्हरचा चंद्राच्या पृष्ठभागावरून आता प्रवास सुरू होणार आहे.

  • 10/15

    या रोव्हरच्या साहाय्याने चंद्रपृष्ठावर असलेल्या घटकांचे रासायनिक विश्लेषणही करण्यात येईल.

  • 11/15

    चंद्रपृष्ठावरील घटकांच्या परीक्षण-प्रयोगासाठी ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’वर वैज्ञानिक प्रयोग-नोंदींसाठीची यंत्रणा (सायंटिफिक पेलोड) आहे.

  • 12/15

    रोव्हरच्या साहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास केला जाणार आहे.

  • 13/15

    चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्या आणि विवरांचे अचूक स्कॅन करण्याचा प्रयत्न या रोव्हरच्या साहाय्याने केला जाणार आहे.

  • 14/15

    या परिसराची छायाचित्रे काढून त्याचा अभ्यास केला जाणार आहे. (Express Photo By Amit Chakravarty)

  • 15/15

    विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर हे एक चंद्र दिवसासाठी (१४ पृथ्वी दिवस) काम करणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)

TOPICS
इस्रोISROचांद्रयान ३chandrayaan 3मराठी बातम्याMarathi News

Web Title: Isro chandrayaan 3 moon soft landing south pole why it is important india become first country detailed information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.