• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut big statement on police lathi charge on maratha protest in jalna pbs

“ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….

Updated: September 4, 2023 00:15 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मोठं विधान केलं आहे.
    1/18

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मोठं विधान केलं आहे.

  • 2/18

    संजय राऊतांनी लाठीमार करण्यात आला त्या दिवशी आलेल्या अदृश्य फोनचा उल्लेख करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर गंभीर आरोप केले.

  • 3/18

    ते रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….

  • 4/18

    सरकार वैफल्यग्रस्त झालं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही – संजय राऊत

  • 5/18

    त्यांनी एका बाजूला चर्चा केली आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला केला. हा काय प्रकार आहे – संजय राऊत

  • 6/18

    ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीहल्ला सुरू झाला त्यावेळी मुंबईत इंडिया गटाची जोरदार बैठकही सुरू होती – संजय राऊत

  • 7/18

    महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण माध्यमे उद्धव ठाकरे काय बोलतात, राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष देऊन होते – संजय राऊत

  • 8/18

    ही बैठक देशभरात दाखवली जात होती – संजय राऊत

  • 9/18

    त्यावरील माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी या लाठीहल्ल्याचे आदेश दिले का? – संजय राऊत

  • 10/18

    मराठा समाजाने आतापर्यंत इतके मोर्चे काढले. ते सर्व मोर्चे शांतपणे, शिस्तबद्धपणे काढले – संजय राऊत

  • 11/18

    त्यांनी लाखो लाखोंचे मूक मोर्चे काढले. कधीही त्यांच्याकडून बेशिस्तपणा घडला नाही – संजय राऊत

  • 12/18

    आधीच्या मोर्चांमध्ये आंदोलकांसह पोलिसांनीही या संयम राखला – संजय राऊत

  • 13/18

    हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही घडलं आहे. तेव्हा पोलिसांनी लाठी उगारली नाही – संजय राऊत

  • 14/18

    मराठा समाजातील आंदोलकांनी संयम सोडला नाही – संजय राऊत

  • 15/18

    मग काल अचानक जालन्यात हे का घडलं? – संजय राऊत

  • 16/18

    याची सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता इथपासून चौकशी करा – संजय राऊत

  • 17/18

    मी परत सांगतो, मुंबईत शिवसेनेने यजमानपद भुषवलेल्या देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीला गालबोट लागावं म्हणून हा लाठीहल्ला केला – संजय राऊत

  • 18/18

    त्यासाठी मराठा तरुणांचे, महिलांचे, वृद्धांचे, मुलांचे बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला – संजय राऊत

TOPICS
जालनाJalnaदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut big statement on police lathi charge on maratha protest in jalna pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.