• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rohit pawar on shrikant shinde kalyan bjp loksabha election ssa

“श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपानं बैठका घेण्याचं कारण काय?” रोहित पवारांचा सवाल; म्हणाले…

“एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या लोकांचंही…”, असेही रोहित पवारांनी म्हटलं.

September 24, 2023 00:51 IST
Follow Us
  • rohit pawar reply to sunil shelke allegations of joining hands with bjp
    1/6

    भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांची युती आहे. मग, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका, सर्वे आणि चाचपणी घेण्याचं कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

  • 2/6

    तसेच, मंत्री रवींद्र चव्हाण यांना कदाचित कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते कल्याणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  • 3/6

    कल्याणमध्ये भाजपाच्या बैठका सुरू आहेत. याबाबत प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “यावरून समजून जायचं की भाजपाच्या मनात काय आहे. भाजपा नेहमी लोकनेत्यांना संपवतं. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांना राजकीय दृष्टीकोणातून संपवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. अन्य पक्षातून घेतलेले लोकनेतेही संपले आहेत. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या लोकांचंही महत्व कमी केलं जाईल.”

  • 4/6

    “भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युती आहे. मग श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका, सर्वे आणि चाचपणी घेण्याचं कारण काय? भाजपाला फक्त त्यांचं चिन्ह आणि पक्ष समजतो. बाकी कोणतेही नेते आणि लोकांचं प्रश्न समजत नाहीत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

  • 5/6

    “बरोबर गेलेले सर्व नेते भाजपाच्या चिन्हावर लढतील. तर, रवींद्र चव्हाण यांना कदाचित कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

  • 6/6

    अजित पवार गटात पक्षबांधणीतच गटबाजी दिसून आली आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटात फक्त बीड जिल्ह्यातच गटबाजी नाही. अजित पवार गटातील बऱ्याच कार्यकर्त्यांना भाजपाबरोबर गेल्यानंतर सुरूवातीला गारगार वाटलं. पण, आता भाजपाची प्रवृत्ती दिसत आहे. त्यांच्या मोठ्या गटात अस्वस्थता जाणवत आहे.”

TOPICS
डॉ. श्रीकांत शिंदेभारतीय जनता पार्टीBJPरोहित पवारRohit Pawar

Web Title: Rohit pawar on shrikant shinde kalyan bjp loksabha election ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.