Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharad pawar comment on odi cricket world cup 2023 ind vs pak match pbs

“काल भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना बघितला आणि…”; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांनी पक्षातील बंडखोरांपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापर्यंत भाष्य केलं. ते काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: October 15, 2023 23:41 IST
Follow Us
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं.
    1/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं.

  • 2/15

    यावेळी त्यांनी पक्षातील बंडखोरांपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापर्यंत भाष्य केलं. ते काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 3/15

    मी दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं की, कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या आणि आता वेगळा रस्ता स्विकारलेल्या लोकांनीही त्यांच्या अध्यक्षाची निवड केली – शरद पवार

  • 4/15

    फरक एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते कधीच तुरुंगात गेलेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तो सर्व इतिहास माहिती आहे – शरद पवार

  • 5/15

    आजची पक्षाची ही बैठक नवा रस्ता दाखवणारी, आत्मविश्वास देणारी आहे. याचा मला आनंद आहे – शरद पवार

  • 6/15

    सध्या इथं आपण जयंत पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं काम करतो आहे. मात्र, काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आहे – शरद पवार

  • 7/15

    आपल्यावर दोन ठिकाणी खटले दाखल आहेत. एक खटला निवडणूक आयोगात आहे. तेथे सांगण्यात येतंय की, हा पक्ष त्यांचाच आहे – शरद पवार

  • 8/15

    दुसरा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या दोन्ही ठिकाणी तुमच्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला – शरद पवार

  • 9/15

    मला खात्री आहे की, आज ना उद्या निकाल लागेल त्यावेळी सामान्य माणसाच्या अंतःकरणात बसलेली खरी राष्ट्रवादी कोण याचा निकाल आपल्या बाजूने होईल आणि चित्र बदलेल – शरद पवार

  • 10/15

    आपल्या पक्षाच्या वतीने ही कोर्ट कचेरी चालू आहे. त्यात निष्णात वकील काम करत आहेत – शरद पवार

  • 11/15

    जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या सर्व कोर्टाच्या कामात माहिती घेण्यासाठी उपस्थित असतात. तसेच वकिलांना लागणारी मदत देत असतो – शरद पवार

  • 12/15

    यामुळे दिवसेंदिवस आपलं म्हणणं सत्यावर आधारित आहे हे लोकांसमोर येईल, याची मला खात्री आहे – शरद पवार

  • 13/15

    काल भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना बघितला आणि अतिशय चांगला सामना झाला – शरद पवार

  • 14/15

    भारताचा विजय झाला. त्या विजयात मुंबईच्या खेळाडूचं योगदान हे अधिक होतं – शरद पवार

  • 15/15

    म्हणून साहजिकच आपण सर्वजण त्या सामन्याबाबत आनंदी होतो – शरद पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar comment on odi cricket world cup 2023 ind vs pak match pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.