• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis comment on drugs smuggling accused lalit patil arrest pbs

“मी पळालो नाही, मला पळवलं गेलं”; ललित पाटीलच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

October 18, 2023 20:21 IST
Follow Us
  • ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली.
    1/16

    ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली.

  • 2/16

    अटकेनंतर ललित पाटीलने मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं असा गंभीर आरोप केला.

  • 3/16

    तसेच यात कुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावं उघड करणार आहे, असा इशारा दिला.

  • 4/16

    यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१८ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

  • 5/16

    आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत – देवेंद्र फडणवीस

  • 6/16

    याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली – देवेंद्र फडणवीस

  • 7/16

    वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असं काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली – देवेंद्र फडणवीस

  • 8/16

    आता ललित पाटील हातात आला आहे. त्यातून निश्चितपणे एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल – देवेंद्र फडणवीस

  • 9/16

    काही गोष्टी ज्या मला आत्ता समजल्या आहेत त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन – देवेंद्र फडणवीस

  • 10/16

    पण एवढंच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठं ड्रग्जचं जाळं उघड करू – देवेंद्र फडणवीस

  • 11/16

    ललित पाटील मी पळालो नाही, मला पळवलं आहे असं म्हटला. ते सगळंच बाहेर येणार आहे – देवेंद्र फडणवीस

  • 12/16

    पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठं जाळं बाहेर येणार आहे – देवेंद्र फडणवीस

  • 13/16

    तसेच बोलणाऱ्या अनेकांची तोंडं बंद होणार आहे – देवेंद्र फडणवीस

  • 14/16

    आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो यापेक्षा जे ड्रग्जचं जाळं बाहेर येणार आहे. त्यावरून अनेकांची तोंडं बंद होणार आहे – देवेंद्र फडणवीस

  • 15/16

    ससून रुग्णालयावर गुन्हेगारांच्या मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचा आरोप आहे – देवेंद्र फडणवीस

  • 16/16

    त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल – देवेंद्र फडणवीस (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Devendra fadnavis comment on drugs smuggling accused lalit patil arrest pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.