-
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे.
-
मंदिराच्या बांधकामाचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
फोटोंद्वारे मंदिराची भव्यता आणि सुंदरतेचा अंदाज बांधता येतो
-
अयोध्यात उभारण्यात येणारे रामाचे हे नवीन मंदिर ३८० फूट लांब, २५० फूट रुंद आणि १६१ फूट उंच आहे.
-
२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरातील रामाच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.
-
मंदिराचा गाभारा पांढऱ्या संगमरवरी दगडाने बांधण्यात येत आहे.
-
मंदिराच्या प्रत्येक भागात सुरेख आणि सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
-
हे भव्य मंदिर बांधण्यासाठी सुमारे १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
-
तर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे.
-
मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
-
२४ जानेवारी २०२४पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पीटीआय)
१८०० कोटींचा खर्च, १६१ फूट उंची, भव्य गाभारा; असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर! पाहा PHOTO
पाहा अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामाचे फोटो
Web Title: Ayodhya ram mandir latest photos know budget and construction details dpj