Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. all statements of dhirendra krishna shastri in dehu about sant tukaram hindu rashtra pbs

“संत तुकारामांचे अभंग पाण्यावर तरंगले, कारण…”; धीरेंद्र शास्त्रींचं देहूत वक्तव्य, म्हणाले…

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी तुकारामांवरील वादग्रस्त वक्तव्य, तुकारामांचे अभंग पाण्यात तरंगणे आणि भारताला हिंदूराष्ट्र करण्याबाबत वक्तव्ये केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: November 22, 2023 16:09 IST
Follow Us
  • Dhirendra-Krishna-Shastri
    1/15

    बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी तुकारामांवरील वादग्रस्त वक्तव्य, तुकारामांचे अभंग पाण्यात तरंगणे आणि भारताला हिंदूराष्ट्र करण्याबाबत वक्तव्ये केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 2/15

    मी संत तुकाराम महाराजांच्या शीलेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपले अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले होते. मात्र, संत तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत बुडाले नाहीत – धीरेंद्र शास्त्री

  • 3/15

    त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नाही आणि ते पाण्यावर तरंगले. ही संतांची परंपरा आहे – धीरेंद्र शास्त्री

  • 4/15

    भारत अद्भूत देश आहे. या संतांचा आशीर्वाद कायम राहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न संपूर्ण भारतात यशस्वी होईल. तसेच भारत हिंदूराष्ट्र होईल, अशीच प्रार्थना मी केली आहे – धीरेंद्र शास्त्री

  • 5/15

    मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो – धीरेंद्र शास्त्री

  • 6/15

    त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे – धीरेंद्र शास्त्री

  • 7/15

    मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होतं तेवढं वाचलं आहे. मी असं कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेलं नाही – धीरेंद्र शास्त्री

  • 8/15

    तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. कुणी साखर म्हणतं, तर कुणी शुगर म्हणतं – धीरेंद्र शास्त्री

  • 9/15

    त्यामुळे मी निश्चितपणे स्वीकारलं की, माझ्या बोलण्यामुळे वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या – धीरेंद्र शास्त्री

  • 10/15

    माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली – धीरेंद्र शास्त्री

  • 11/15

    मी आचार्य परंपरेचा साधक आहे. असा व्यक्ती कोणत्याही संताचा विरोध करेल असं होणार नाही – धीरेंद्र शास्त्री

  • 12/15

    तसेच असा विरोध करणारा संतांचा अनुयायी होऊच शकत नाही – धीरेंद्र शास्त्री

  • 13/15

    मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे – धीरेंद्र शास्त्री

  • 14/15

    मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील – धीरेंद्र शास्त्री

  • 15/15

    म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर खेद व्यक्त केला होता – धीरेंद्र शास्त्री (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
धीरेंद्र कृष्ण शास्त्रीDhirendra Krishna ShastriपुणेPune

Web Title: All statements of dhirendra krishna shastri in dehu about sant tukaram hindu rashtra pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.