• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shiv sena leader uddhav thackeray in nashik kalaram mandir balasaheb look kvg

गळ्यात रद्राक्षाची माळ, भगवा सदरा; उद्धव ठाकरेंचा ‘बाळासाहेब’ लुक

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली. तसेच गोदाघाटावर आरती केली. यावेळी त्यांनी केलेल्या वेषाची चर्चा झाली. (सर्व फोटो – शिवसेना उबाठा एक्स अकाऊंट)

January 22, 2024 23:45 IST
Follow Us
  • २२ जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना इकडे महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा करण्याचा निर्णय घेतला.
    1/11

    २२ जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना इकडे महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा करण्याचा निर्णय घेतला.

  • 2/11

    नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेत असताना उद्धव ठाकरेंच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधले. स्व. बाळासाहेबांप्रमाणेच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भगवा सदरा त्यांनी परिधान केला होता.

  • 3/11

    उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली.

  • 4/11

    श्री काळाराम देवस्थानच्या पुजाऱ्यांनी महाआरती आणि संकल्पपूर्तीनंतर ठाकरे कुटुंबियांचा सत्कार केला.

  • 5/11

    तत्पूर्वी नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले. यावेळी परिसरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

  • 6/11

    त्यानंतर रामकुंड गोदाघाटावरही उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आरती केली.

  • 7/11

    ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी गोदाघाटावरही लोकांची आणि कार्यकर्त्यांची अशी गर्दी दिसली.

  • 8/11

    काळाराम मंदिरात येण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील स्वा. सावरकर यांचे जन्मगाव भगुर येथील स्मारकाला भेट दिली होती.

  • 9/11

    शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जनता आमच्याबाजूने आहे, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येते. त्याची प्रचिती नाशिकमध्ये पाहायला मिळाली.

  • 10/11

    रामकुंडाचे दर्शन घेत असताना कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात काही काळ संघर्षही झाला.

  • 11/11

    रामकुंडावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्यामुळे अशापद्धतीने रामकुंड लोकांच्या उपस्थितित फुलून गेल्याचे दिसत होते.

TOPICS
अयोध्याAyodhyaउद्धव ठाकरेUddhav Thackerayराम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandir

Web Title: Shiv sena leader uddhav thackeray in nashik kalaram mandir balasaheb look kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.