-
आज मनोहर जोशी यांचं निधन झालं. पहाटे तीन वाजण्यच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दादरच्या स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ( सर्व फोटो-दीपक जोशी )
-
मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. मनोहर जोशी हे जोशी सर म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध होते.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा शिवसेना भवनाच्या समोरुनच गेली. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती.
-
दादर येथील स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी सर यांना बाळासाहेब ठाकरे पंत म्हणून हाक मारत.
-
मनोहर जोशी यांना निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तसंच त्यांना लोकसभा अध्यक्ष, खासदार अशी पदंही भुषवता आली. शिवसेनेसाठी त्यांनी आयुष्य वेचलं.
-
दादरच्या शिवसेना भवनासमोरही मनोहर जोशींना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती.
-
मनोहर जोशी यांनी शिवसेनेत असताना विविध पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं.
मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना साश्रू नयनांनी निरोप
Web Title: Last rituals of shivsena leader manohar joshi uddhav thackeray sharad pawar and other leaders are present scj