-
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आज राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झालेले पाहायला मिळाले.
-
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे वाटत असताना आंदोलनाला मात्र मराठा समाजाने चांगला प्रतिसाद दिला.
-
सोलापुरात मराठा समाजाच्या रास्ता रोको आंदोलनात वधू-वरांसह वऱ्हाडी मंडळी सहभागी झालेले पाहायला मिळाले.
-
पंढरपूर मोहोळ महामार्गावर रास्ता रोको करताना वधू वरांनी रस्त्यावर उतरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी.
-
रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर लग्न मंडपात जाऊन वधू-वरांनी लग्नगाठ बांधली. यामुळे “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” या वाक्याची पुन्हा एकदा आठवण झाली.
-
नांदेड- वसमत रोडवर मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन केले. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी अशी मागणी करण्यात आली. तसेच नांदेड अर्धापुर तालुक्यातील वसमत रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
-
यावेळी नांदेड जिल्ह्यातील आंदोलनात एक आई आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर बसलेली आढळून आली.
-
नांदेड शहराजवळ असलेल्या पिंपळगाव येथे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना मराठा आंदोलकांनी घेराव देखील घातला आहे. मराठा आंदोलकांनी जवळगावकर यांची गाडी पुढे जाऊ दिली नाही. अखेर जवळगावकर यांनी काही किलो मीटर अंतर पायी प्रवास केला.
-
सकल मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्हीही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे.
‘आधी आरक्षण, मगच लगीन’, मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर वधू-वर, तान्ह्या बाळासह आई उतरली रस्त्यावर
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे अधिसूचनेला कायद्यात रुपांतरीत करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी आजपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी मराठे रस्त्यावर उतरले. (Photo – Video Screenshot)
Web Title: Protest held in all over maharashtra to demand maratha reservation and sage soyare law after manoj jarange patil announcement kvg