-
अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते अकोल्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
-
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते संघटनात्मक आढावा घेत आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.
-
बीसीसीआयमध्ये अमित शाह यांच्या मुलाचे योगदान काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
याला भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
-
राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंव शेलक्या शब्दांत टीका केलीय.
-
अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणारे गृहस्थ घरात बसून राहिले. त्यांचे राज्यासाठी काय योगदान होते, ते त्यांनी सांगावे. बाकीच्यांच्या योगदानावर आपण नंतर चर्चा करू, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
-
महायुतीमध्ये प्रत्येकाच्या बलस्थानांची चर्चा होणार. महायुतीचा एकूण ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे.
-
निलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. ते सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
-
त्यावरही राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक लढवण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. त्यामुळे निलेश लंके हे निवडणूक लढवत असतील तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.
-
लोकसभेला किती जागा देणा हे आम्हाला सांगावे, अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
-
यावर बोलताना बच्चू कडू यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी बोलत आहेत. मार्ग निघेल असं वाटतंय.
-
सर्व नाराज घटकांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येईल. कारण महायुतीच्या दृष्टीने प्रत्येक घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही विखे पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या जय शाहांवरील ‘त्या’ टीकेला विखे पाटलांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “घरात बसून…”
उद्धव ठाकरेंच्या जय शाहांवरील टीकेला विखे पाटलांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “घरात बसून…”
Web Title: Radhakrishna vikhe patil criticized uddhav thackeray for comment on amit shah son jay shah prd