Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of mumbai local train derailed near csmt harbour line spb

PHOTO : पनवेल ते सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरला; लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरल्याची घटना घडली.

April 29, 2024 16:47 IST
Follow Us
  • mumbai local train derailed
    1/12

    हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरल्याची घटना घडली. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 2/12

    त्यामुळे या भागातील लोकल सेवा खोळंबली होती. तसेच प्रवाशांमध्ये हाल झाले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 3/12

    ही लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 4/12

    सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 5/12

    यावेळी डब्यात बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 6/12

    त्यामुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 7/12

    मात्र, ट्रेनच्या वेगावर नियंत्रण मिळवत चालकाला लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळाले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 8/12

    त्यानंतर अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 9/12

    या घटनेमुळे या मार्गावरील अनेक लोकल या रखडल्या असून याचा डाऊन मार्गावरही परिणाम झाला. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 10/12

    या घटनेनंतर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात असून काही लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीचा प्रवासाला निघत आहेत. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 11/12

    महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

  • 12/12

    या दुर्घटनेत कोणताही जिवीतहानी झाली नसून मुख्य मार्गावरही कोणताही परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमुंबई लोकलMumbai Local

Web Title: Photos of mumbai local train derailed near csmt harbour line spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.