• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is mns konkan election candidate abhijit panse film maker spl

मनसेचे कोकण पदवीधर निवडणुकीतील उमेदवार अभिजीत पानसे कोण आहेत? केले आहे ‘या’ प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन!

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे हे आमदार असून सलग तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Updated: May 28, 2024 11:22 IST
Follow Us
  • mns candidate Abhijit panse
    1/10

    मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचा आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले.त्यांनी भाजपा उमेदवार नारायण राणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच कल्याण, ठाणे या मतदारसंघातही प्रचारसभा घेतल्या. राज ठाकरे महायुतीच्या सांगतासभेतही पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भाषण करताना दिसले.

  • 2/10

    आता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व पाच टप्पे पूर्ण झाले आहेत आणि राज ठाकरेंनी आता कोकणातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध उमेदवार जाहीर केला आहे.

  • 3/10

    पक्षाचे नेते अभिजीत पानसे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

  • 4/10

    मनसेने दिलेले उमेदवार अभिजित पानसे कोण आहेत?
    शिवसेनेत असताना राज ठाकरे आणि अभिजीत पानसे एकत्र काम करत होते, त्यानंतर मनसे पक्षात राज ठाकरे यांच्याबरोबर राहिले. शिवसेनेत असताना विद्यार्थी सेनेची धुरा ते सांभाळत होते.

  • 5/10

    लेखन ते दिग्दर्शन असा प्रवास
    रेगे, ठाकरे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी आलेल्या रानबाजार वेबसीरीजचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. राजकारणात सक्रीय असलेले अभिजित पानसे यांनी मनसे चित्रपट सेनेचे कामही त्यांनी पाहिले आहे. अभिजीत पानसे हे राज ठाकरेंचे विश्वासू मानले जातात. मनसेकडून २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

  • 6/10

    मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही खळबळ उडाली असून राज यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या गोटात प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.

  • 7/10

    उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न…
    पानसे यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपचे नेते लवकरच राज यांना साकडे घालतील, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्याने ‘लोकसत्ता’ला दिली. लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत नाही तोच पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आम्हालाही धक्का बसला, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील एका नेत्याने दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत मनसे नेतेही आमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात होते. त्यामुळे राज यांची भूमिका अचंबित करणारी आहे, असे या नेत्याने सांगितले.

  • 8/10

    १२ वर्षांत पदवीधरांसाठी एकही काम नाही पानसे
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवडणूक लढवत असून आम्ही निवडणूक स्वतंत्र लढत असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदारसंघात मागील १२ वर्षांत पदवीधरांसाठी एकही काम झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 9/10

    कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोकण पदवीधर मतदारसंघात तरुणांच्या रोजगाराची समस्या आहे. मागील बारा वर्षांत या मतदारसंघात कोणतेही ठोस असे कार्य झाले नाही. केवळ गटार, पायवाटा तयार करण्याच्या पुढे येथून निवडून आलेल्या आमदारांची मजल गेली नाही, असा आरोप पानसे यांनी केला.

  • 10/10

    आम्ही जाहीरनामा किंवा वचननामा नाही, तर कोकणच्या तरुणांचा रोजगारनामा घेऊन उतरत आहोत, असेही पानसे यांनी सांगितले. मनसेच्या वतीने या मतदारसंघात ३५ हजारांहून अधिक नोंदणी झालेली आहे, असे पानसे यांनी सांगितले. (सर्व फोटो अभिजीत पानसे या फेसबुक पेजवरून साभार)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Who is mns konkan election candidate abhijit panse film maker spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.