-
तिने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे. हिमाचल मधील मंडी या मतदारसंघातून अभिनेत्रीने विजय प्राप्त केला आहे.
-
दरम्यान निकाल लागल्यानंतर कंगना सोबत एक घटना घडली, या घटनेची माहिती तिने स्वतःच एका पोस्टद्वारे दिली आहे.
-
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कंगना मंडीतून दिल्लीकडे रवाना होत असतान चंदीगड विमानतळावर कंगना सोबत एक घटना घडली.
-
कंगनाच्या म्हणण्यानुसार तिला सिक्युरिटी चेकिंगच्या दरम्यान सीआयएफ जवान कुलविंदर कौर या महिलेने श्रीमुखात लगावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.
-
त्यानंतर कुलविंदर कौर या महिलेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर एफ आय आर देखील झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
टिकैत म्हणाले, कंगना म्हणते तिला झापड मारली पण मला त्यात काही तथ्य वाटत नाही, नक्की थोडा काही काही वाद झाला असेल, सीआयएसएफ जवान कुलविंदरला कंगनाच्या काही वक्तव्यामुळे राग आलेला असेल. जय जवान आणि जय किसान ही घोषणा आम्ही नेहमी देतो तर कुलविंदरही एक जवान आहे. देशाच्या रक्षणासाठी असलेले सर्व सैनिक आणि जवान हे शेतकरी कुटुंबांतून येतात. त्यामुळे कोणत्याही नेत्याने किंवा खासदाराने कोणाही व्यक्तीबद्दल, त्याच्या जात-धर्माबद्दल, त्याच्या व्यवसायाबद्दल तसेच आदिवासी-शेतकरी लोकांबद्दल चुकीचे शब्द वापरू नयेत.
-
टिकैत पुढे म्हणाले मान्य आहे तुमची काही नाराजी असू शकते पण तुम्ही कर्तव्य बजावत असताना गणवेशात असताना असं काही करणे हेही योग्य नाही. विरोध करण्यासाठी इतरही मार्ग आहेत त्यांचा अवलंब करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
-
(सर्व फोटो- कंगना रणौत, राकेश टिकैत सोशल मीडिया)
PHOTOS : “मला त्यात काही तथ्य…”, कंगनाच्या झापड प्रकरणावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?
कंगना रणौतच्या झापड प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत असताना, आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एनएनआयशी बोलताना यावर त्यांचे मत मांडले आहे.
Web Title: Farmers leader rakesh tikait on kangana ranaut latest statement on the chandigarh airport slap controversy spl