• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. delhi water crisis desperate residents struggle in long queues see photos spl

PHOTOS : उष्णतेच्या लाटेसह दिल्लीमध्ये भीषण जल संकट; टँकरच्या पाण्यासाठी नागरिक तासंतास रांगेत

दिल्लीमध्ये अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही, त्यामुळे तेथील पाण्याचे संकट वाढतच चालले आहे. दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे सामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.

June 14, 2024 15:10 IST
Follow Us
  • New Delhi Water Crisis
    1/9

    उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये अजूनही भीषण उन्हाळा सुरू आहे. अजून पावसाने तिथे हजेरी लावली नाही. दिल्लीमध्ये तर उकाड्याने लोक हैराण आहेत. उकड्याशिवाय दिल्लीमध्ये पाणीटंचाई आणि विजेचा प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा आहे. वाढत्या तापमानासह लाखो लोक पाण्यासाठी तरसत आहेत. (Photo- PTI)

  • 2/9

    दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणी टंचाईमुळे दिल्लीतील अनेक भागांमधील लोकांना अडचण निर्माण झाली आहे. पाण्याच्या थेंबा थेंबासाठी दिल्लीतील काही भागातील लोक तरसत आहेत. अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, परंतु त्यासाठी लांबच लांब रांगा लावून नागरिकांना तासंतास उभा रहावं लागत आहे. (Photo- PTI)

  • 3/9

    या फोटोमध्ये आपण पाहू शकतो दिल्लीतील नागरिक पाणीटंचाईशी कसा सामना करत आहे. टँकरच्या रांगेमध्ये तासंतास उभा राहून तेथील लोक आपल्या पाण्याची गरज भागवत आहेत. दिल्लीतील पाणीटंचाई वरून राजकारणही पेटले आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार या सर्व समस्येसाठी हरियाणा सरकारला जबाबदार धरत आहे. (Photo- PTI)

  • 4/9

    तर दुसऱ्या बाजूला भाजपाचं म्हणणं आहे की आम आदमी पक्षाकडून जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करण्यासाठी हे सर्व केले जात आहे, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा वाढेल आणि टँकर माफीया लोकांना त्याचा फायदा होईल त्यातून पैसा कमावता येईल, अशी टीका भाजपा करत आहे. (Photo- PTI)

  • 5/9

    पाणीटंचाईच्या या मुद्द्यावर बुधवारी १२ जून रोजी उच्च न्यायालयामध्ये टँकर माफियांच्या बाबतीतील खटल्यावर सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला चांगलंच सुनावलं आहे. टँकर माफियांविरुद्ध जर सरकार काही कारवाई करत नसेल तर न्यायालयाला दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश द्यावे लागतील अशी टिप्पणी न्यायालयाने केली. (Photo- PTI)

  • 6/9

    यानंतर दिल्ली सरकारने एक परिपत्रक काढले आहे, त्यामध्ये टँकर माफियांविरुद्ध कारवाई करता येत नाही कारण ते सर्व जाळे हरियाणा मधून चालत आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं हे आमच्या हद्दीत येत नसल्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नसल्याचे म्हंटले आहे. (Photo- PTI)

  • 7/9

    दरम्यान दिल्लीमध्ये स्वतःचा असा पाणीसाठा नसल्यामुळे शेजारील राज्यांवर दिल्लीतील पाणी व्यवस्था अवलंबून आहे. दिल्लीतील पाण्याची गरज हरियाणमधील यमुना नदी, उत्तर प्रदेशमधील गंगा नदी, आणि पंजाबमधील भाकडा नांगल धरण येथून पूर्ण होते. (Photo- PTI)

  • 8/9

    दरम्यान याबद्दल न्यायालयाने हिमाचल सरकारला दिल्लीसाठी वेगळं पाणी सोडण्याची सूचना केली आहे, परंतु हिमाचल सरकारने सांगितले की त्यांच्याकडे पाणीसाठा नसल्याने ते शक्य होणार नाही. (Photo- PTI)

  • 9/9

    हेही पहा- Chirag Paswan: पक्ष फुटला, चिन्हही गेले पण न डगमगता १०० टक्के स्ट्राईक रेटने निकाल खेचला; आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात!

TOPICS
दिल्लीDelhiपाणीWaterमराठी बातम्याMarathi News

Web Title: Delhi water crisis desperate residents struggle in long queues see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.