-
अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गने दावा केला आहे की माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदाणी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी निगडीत बनावट परदेशी फंडांमध्ये हिस्सेदारी होती. (इंडियन एक्सप्रेस)
-
माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांनी सेबीमध्ये नियुक्तीच्या काही आठवड्यांपूर्वी मॉरिशसस्थित फंड प्रशासक ट्रायडेंट ट्रस्टला ई-मेल पाठवला होता असे दस्तऐवज असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंडातील गुंतवणुकीचा उल्लेख होता. (इंडियन एक्सप्रेस)
-
अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, माधबी बुच सेबीच्या अध्यक्षा होण्यापूर्वी त्यांच्या पतीने विनंती केली होती की आता ते सर्व खाती चालवतील. माधबी बुच यांनी सेबीच्या आधीही अनेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले होते. यासोबतच माधबी बुच यांचा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशीही संबंध आहे. या हल्ल्यादरम्यान त्या पतीसह अडकून पडल्या होत्या. याबद्दल जाणून घेऊयात (इंडियन एक्सप्रेस)
-
माधबी बुच यांनी १९८९ मध्ये आयसीआयसीआय बँकेतून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. १९९३-१९९५ पर्यंत, त्या इंग्लंडच्या वेस्ट चेशायर कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. सेल्स, मार्केटिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट यासारख्या विविध प्रोफाईलमध्ये त्यांनी १२ वर्षे विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
२००६ मध्ये ICICI बँक सिक्युरिटीजमध्ये त्या सामील झाल्या, त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २००९ ते मे २०११ पर्यंत व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून काम केले. (इंडियन एक्सप्रेस)
-
यानंतर, माधबी बुच सिंगापूरला गेल्या, जिथे त्यांनी २०११ मध्ये ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये काम केले. २०११ ते २०१७ दरम्यान, माधबी बुच यांनी झेनसार टेक्नॉलॉजीज, इनोव्हन कॅपिटल आणि मॅक्स हेल्थकेअर यासारख्या अनेक कंपन्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून विविध पदे भूषवली. (इंडियन एक्सप्रेस)
-
माधबी पुरी बुच यांनी इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (ISDM) चे स्वतंत्र संचालक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (BRICS बँक) सल्लागार म्हणूनही काम केले आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
माधबी बुच यांचे पती धवल बुच सध्या ब्लॅकस्टोन आणि अल्वारेझ आणि मार्शल येथे वरिष्ठ सल्लागार आहेत. याआधी त्यांनी युनिलिव्हरमध्ये ३० वर्षे काम केले होते. २००६ मध्ये ते युनिलिव्हरचे कार्यकारी संचालक झाले आणि २०१९ पर्यंत त्यांनी या कंपनीत काम केले. युनिलिव्हर सोडण्यापूर्वी ते मुख्य खरेदी अधिकारी होते. (इंडियन एक्सप्रेस)
-
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्यांमध्ये माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा समावेश आहे. वास्तविक, जेव्हा मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्या आपल्या पतीसोबत ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये होत्या. (इंडियन एक्सप्रेस)
-
त्यादरम्यान त्यांचे पती धवल बुच युनिलिव्हरच्या मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी तेथे गेले होते. पण, यादरम्यान दहशतवादी हल्ला झाला आणि माधबी पुरी बुच पतीसह इतर लोकांसह तिथे अडकल्या. (इंडियन एक्सप्रेस)
Madhavi Buch :सेबी प्रमुख माधवी बुच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पतीसह अडकल्या होत्या, वाचा संपूर्ण प्रकरण
Hindenburg-Adani case Madhavi Buch has connection with 26/11 Mumbai terrorist attack: SEBI प्रमुख माधवी बुच यांचा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी कसा आहे संबंध, पतीचाही सहभाग, जाणून घेऊ संपूर्ण प्रकरण काय आहे?
Web Title: Hindenburg adani case madhavi puri buch has connection with 2611 mumbai terrorist attack her husband was also with her know how spl