-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “बँकिंग क्षेत्रात जी सुधारणा झाली ती यापूर्वी कधीही झाली नव्हती. आज आपल्या बँकांनी जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. बँकिंग मजबूत झाल्यावर अर्थव्यवस्थेची ताकदही वाढत असते.”
-
पंतप्रधान म्हणाले की, “करोडो लोकांच्या कोविड लसीकरणाचे काम जगामध्ये सर्वाधिक जलद गतीने आपल्या देशात झाले आहे.”
-
“दहशतवादी आपल्या देशात यायचे, आपल्या लोकांना मारायचे आणि निघून जायचे, जेव्हा देशाचे सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते, जेव्हा देशाचे सैन्य हवाई हल्ले करून जशास तसे उत्तर देते तेव्हा देशातील तरुणांची छाती अभिमानाने भरते. हा भारताचा सुवर्णकाळ आहे, ही संधी सोडता कामा नये.”
-
“धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करणारे कायदे हटवले पाहिजेत, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज आहे आणि आधुनिक समाजात चुकीच्या कायद्यांना स्थान नाही.” असे पंतप्रधान म्हणाले.
-
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “देशातील तरुणांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची गरजच पडू नये असे मला वाटते, लाखो रुपये खर्चून त्यांना बाहेर जावे लागते, तरुणांसाठी इथेच देशात दर्जेदार असे शैक्षणिक धोरण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.”
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात कोलकाता येथील महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा उल्लेख केला नाही, परंतु अप्रत्यक्षरीत्या ते म्हणाले की, “महिलांविरुद्ध राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.”
-
“आता युवकांनी पुढे येऊन देशातील राजकारणामध्ये उतरले पाहिजे असे वाटते, आपण असेही धेय्य ठेवायला हवे की कोणतीही राजकीय परंपरा, वारसा नसलेल्या देशामधील १ लाख युवकांना राजकारणात आणले पाहिजे.”
-
“आव्हान कितीही मोठे असो. आव्हान पेलणे हा भारताचा स्वभाव आहे, आपण थांबणार नाही आणि झुकणार नाही, संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि १४० कोटी भारतीयांचे भवितव्य ठरवण्यासाठी आपण कठोर परिश्रम करणार आहोत. वाईट हेतू असलेल्यांचा चांगल्या हेतूने पराभव करू.”
-
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जी-२० मधील इतर देशही करू शकले नाहीत ते भारताने करून दाखवले आहे. तसेच आपण २०३० पर्यंत ५०० गिगाव्हॅटपर्यंत रिन्यूएबल ऊर्जा तयार करणार आहोत. लोक आश्चर्यचकित होतात की हे आपण कसे करतो, परंतु आपण हे करत राहू. हे आपल्याला भविष्यात उपयोगी येणार आहे.”
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वैद्यकीय क्षेत्रातील जागांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आणि पुढील पाच वर्षांत ७५ हजार नवीन वैद्यकीय जागा वाढवणार असल्याचे सांगितले. (सर्व फोटो : पीटीआय)
Pm Modi Independence Day Speech : लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदी ‘कोलकाता बलात्कार-हत्या’ प्रकरणावर काय म्हणाले? वाचा ठळक १० मुद्दे
10 big things about pm narendra modi speech from red fort: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आजच्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील मुख्य १० महत्वाच्या मुद्द्यांना जाणून घेऊ.
Web Title: Pm modi s reaction in gestures on kolkata rape murder case these are the 10 big things about pm narendra modi speech from red fort spl