• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. vinesh phogat julana assembly haryana election congress bjp captain yogesh bairagi aap kavita dalal spl

Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी कुस्तीपटू विनेश फोगट जुलान्यातील काँग्रेसचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवणार का?

कुस्तीतून निवृत्त होत आाता विनेश फोगट निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, पण जुलानात ती काँग्रेसचा झेंडा फडकवू शकेल का?

Updated: September 13, 2024 18:51 IST
Follow Us
  • Vinesh Phogat election, Vinesh Phogat constituency, Vinesh Phogat julana constituency, julana constituency assembly election 2024
    1/9

    विनेश फोगटला इतिहास रचण्याची सवय आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५३ किलो फ्रीस्टाइल महिला कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला, जरी ती पदक जिंकण्यापासून हुकली. आता विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, ती इथेही इतिहास रचू शकेल का?

  • 2/9

    भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट पहिल्यांदाच हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विनेश फोगटला यावेळी काँग्रेसकडून तिकीट मिळाले असून कुस्तीच्या आखाड्यानंतर ती निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावताना दिसणार आहेत.

  • 3/9

    जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. विनेशचा सामना प्रामुख्याने भाजपाचे कॅप्टन योगेश बैरागी आणि आपच्या उमेदवार कविता दलाल यांच्याशी होणार आहे.

  • 4/9

    विनेश फोगट ज्या जागेवर निवडणूक लढवणार आहे, त्या जागेवर गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा रेकॉर्ड खराब आहे. २००५ मध्ये जुलाना येथे काँग्रेसने शेवटचा विजय मिळवला होता. म्हणजे गेल्या १९ वर्षांपासून काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.

  • 5/9

    विनेश फोगटला हा १९ वर्षांचा वाईट विक्रम मोडण्याची संधी असेल, कॉँग्रेसला विनेशच्या नावाचा फायदा होतो की नाही हे येणाऱ्या कळत स्पष्ट होईल.

  • 6/9

    विनेश फोगटने अलीकडेच तिच्या कुस्ती कारकिर्दीला निरोप दिला आणि त्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा केली.

  • 7/9

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतर विनेशने आपल्या कुस्ती कारकिर्दीला अलविदा केला होता.

  • Vinesh Phogat election, Vinesh Phogat constituency, Vinesh Phogat julana constituency, julana constituency assembly election 2024
    8/9

    विनेशने कुस्ती सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि यावेळी तिला निवडणूक लढवण्यासाठी तिकीटही मिळाले. राजकारणातून खेळ आणि देशाला पुढे नेण्याचे काम करणार असल्याचे विनेशने स्पष्टपणे सांगितले आहे. (सर्व फोटो साभार- एपी)

  • 9/9

    हेही वाचा- जगातील सर्वात शक्तिशाली बॉडीबिल्डरचे ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, फिट असूनही लोक जीवानिशी का जातात?

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh Phogat

Web Title: Vinesh phogat julana assembly haryana election congress bjp captain yogesh bairagi aap kavita dalal spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.