-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख तर मिळवून दिलीच, पण जगातील अनेक देशांकडून त्यांना उच्च सन्मान मिळाला आहे. नरेंद्र मोदींना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत, जे त्यांचे जागतिक महत्त्व आणि प्रभाव दर्शवतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ते जाणून घेऊया.
-
३ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौदने सन्मानित केले.
-
४ जून २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानने स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्काराने सन्मानित केले.
-
१० फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदींना ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
८ जून २०१९ रोजी मालदीवने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ इज्जुद्दीनने सन्मानित केले.
-
२४ ऑगस्ट २०१९ रोजी पीएम मोदींना UAE द्वारे ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
२४ ऑगस्ट २०१९ रोजी, पीएम मोदींना बहरीनने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्सने सन्मानित केले.
-
२१ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने पंतप्रधान मोदींना लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले.
-
२२ मे २०२३ रोजी, फिजीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान केला.
-
२२ मे २०२३ रोजी PM मोदींना पापुआ न्यू गिनी द्वारे कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द पीपल ने देखील सन्मानित करण्यात आले.
-
२५ जून २०२३ रोजी पंतप्रधान मोदींना इजिप्तमध्ये ऑर्डर ऑफ द नाईलने सन्मानित करण्यात आले.
-
१४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सने पंतप्रधान मोदींना लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले.
-
२५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रीसने पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ ऑनरने सन्मानित केले.
-
२४ मार्च २०२४ रोजी भूतानने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.
-
९ जुलै २०२४ रोजी रशियाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्काराने सन्मानित केले.
(Photos Source: Reuters, ANI, @narendramodi/Twitter)
अमेरिका, रशिया, फ्रान्ससारख्या विविध देशांनी पंतप्रधान मोदींना ‘या’ प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे
International Honors Received by PM Modi: जगातील अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. यामध्ये सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, UAE, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका यांसारख्या प्रमुख देशांतील प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.
Web Title: List of world prestigious awards and honours received by prime minister narendra modi spl