• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. where has vikramaditya singh invested the most the price of these two houses is rs 64 crores spl

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या दोन घरांची किंमत ६४ कोटी रुपये, एकूण मालमत्ता किती?

Where has Vikramaditya Singh invested the most : हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांच्या फक्त दोन घरांची किंमत 64 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांनी जमीन आणि व्यावसायिक इमारतींमध्येही भरपूर पैसा गुंतवला आहे.

September 26, 2024 21:23 IST
Follow Us
  • Vikramaditya Singh Congress
    1/10

    हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी नुकतेच सांगितले होते की, उत्तर प्रदेशप्रमाणे त्यांच्या सरकारनेही दुकान मालकांची नावं बाहेर फलकांवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. विक्रमादित्य हे खूप श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घेऊ. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 2/10

    या वर्षी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या मालमत्तेचा तपशील देखील myneta.info या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटनुसार त्यांचे बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये 43 लाख रुपये जमा आहेत. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 3/10

    विक्रमादित्य सिंह यांनी रोखे, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये 3 कोटी 38 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच त्यांच्याकडे 1 कोटी 50 लाख रुपयांच्या एलआयसी आणि इतर विमा पॉलिसी आहेत. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 4/10

    विक्रमादित्य यांच्या घरात 2 कोटी 86 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्याच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर आणि नेक्सा इग्निस कार्स आहेत. या तिन्ही वाहनांची किंमत अंदाजे 33 लाख रुपये आहे. (Photo – Indian Express)

  • 5/10

    विक्रमादित्य यांच्याकडे खूप मालमत्ता आहे. त्यांच्याकडे शिमल्यात 11 कोटी 93 लाख रुपयांच्या 4 शेतजमिनी आहेत. याशिवाय 77 लाख रुपयांची अकृषि जमीन आहे. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 6/10

    myneta.info वेबसाइटनुसार, विक्रमादित्य यांच्याकडे 100 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. यासोबतच त्यांच्यावर 1 कोटी 37 लाख रुपयांचे कर्जही आहे. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 7/10

    याशिवाय विक्रमादित्य यांची रामपूरमध्ये 7 कोटी 53 लाख रुपयांची व्यावसायिक इमारत आहे. त्यांची शिमल्यातही 4 कोटी 48 लाख रुपयांची व्यावसायिक इमारत आहे. (Photo: Vikramaditya Singh/FB)

  • 8/10

    विक्रमादित्य यांचे पदम पॅलेस नावाचे वडिलोपार्जित घर आहे. त्याची सध्याची किंमत 30 कोटी 52 लाख रुपये आहे. यासोबतच त्यांच्याकडे 35 कोटी 90 लाख रुपयांचे होली लॉज आहे.. (Photo – Indian Express)

  • 9/10

    याशिवाय त्याच्याकडे ३५ लाख रुपयांची आणखी दोन निवासी घरे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे एकूण 90 कोटी रुपयांची मालमत्ता आहे

  • 10/10

    हेही वाचा- धनश्री वर्माचं नवं फोटोशूट, सौदी अरेबियातील इव्हेंटसाठी केला क्लासी लूक, पाहा Photos… 

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: Where has vikramaditya singh invested the most the price of these two houses is rs 64 crores spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.