• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. when hezbollah chief hassan nasrallah pushed israeli forces back from lebanon know who it was and how the israeli army killed him spl

हसन नसराल्लाहमुळे इस्रायली सैन्याला लेबनॉनमधून माघार घ्यावी लागली होती?, कोण होता हिजबोला प्रमुख आणि त्याचा खात्मा कसा करण्यात आला?

Israel army Killed Hezbollah chief Hassan Nasrallah Beirut strike: हिजबोला प्रमुख शेख हसन नसराल्लाहला इस्रायली सैन्याने ठार केले असल्याचा दावा केला आहे. हसन नसराल्ला कोण होता आणि त्याला इस्रायली सैन्याने कसे मारले? जाणून घेऊ.

Updated: September 29, 2024 17:10 IST
Follow Us
  • Hezbollah Chief Hassan Nasrallah
    1/9

    हिजबोलाह प्रमुख शेख हसन नसरल्लाह याचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. हिजबोलासाठी हा मोठा धक्का आहे. अशा परिस्थितीत इस्रायलने नसराल्लाहची हत्या कशी केली आणि तो कोण होता हे जाणून घेऊया. (फोटो: रॉयटर्स)

  • 2/9

    त्याची हत्या कशी झाली?
    वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) शुक्रवारी रात्री उत्तर-पूर्व लेबनॉनमधील बेरूतमधील दहिता भागात लक्ष्यित हल्ला केला. आयडीएफला माहिती मिळाली होती की हसन नसराल्लासह हिजबोलाचे अनेक मोठे नेते येथे उपस्थित आहेत. (फोटो: रॉयटर्स)

  • 3/9

    ती जागा भूमिगत होती
    यानंतर इस्रायलच्या हवाई दलाने थेट लढाऊ विमानांनी हिजबोलाच्या या मुख्यालयाला लक्ष्य केले. हिजबोलाने हे मुख्यालय बेरूतमधील दहिता भागात एका निवासी इमारतीखाली भूमिगत ठिकाणी तयार केले होते. (फोटो: एपी)

  • 4/9

    संपूर्ण मुख्यालय उद्ध्वस्त
    इस्रायली संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली सैन्याने संपूर्ण मुख्यालय उद्ध्वस्त केले ज्यात हिजबोला प्रमुख तसेच त्याची मुलगी आणि अनेक लोक मारले गेले. (फोटो: रॉयटर्स)

  • 5/9

    नसराल्ला कुठून आला होता?
    शेख हसन नसरल्लाह याचा जन्म १९६० मध्ये बुर्ज हम्मूद, बेरूत येथे झाला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, हसन नसरल्लाहने लेबनॉनमध्ये १९७५ मध्ये पहिल्यांदा ‘अमाल मुव्हमेंट’मध्ये भाग घेतला होता. यानंतर १९८२ मध्ये जेव्हा इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला तेव्हा ‘इस्लामी अमल’ ही नवी संघटना स्थापन झाली, ज्याला इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्सचा पाठिंबा मिळाला आणि नंतर ती हिजबोला बनली. (फोटो: रॉयटर्स)

  • 6/9

    अमेरिका आणि सोव्हिएत युनियनला आपले सर्वात मोठे शत्रू मानले.
    हिजबोलाने अधिकृतपणे १९८५ मध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि अमेरिका आणि सोव्हिएत युनियनला आपले सर्वात मोठे शत्रू म्हटले. हसन नसरल्लाहला संघटनेतील भरतीपासून प्रशिक्षणापर्यंतची जबाबदारी मिळाली आणि अब्बास अल-मौसावी (१९८२) यांच्या मृत्यूनंतर त्याने गटाची कमानही हाती घेतली. (फोटो: रॉयटर्स)

  • 7/9

    जेव्हा इस्रायलला माघार घ्यावी लागली
    १९९२ मध्ये, हसन नसरल्लाह हिजबोलाचा प्रमुख बनताच, मौसावीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने तुर्कीमधील इस्रायली दूतावासावर हल्ला केला आणि इस्रायलवर रॉकेट हल्लाही केला. यानंतर २००० मध्ये हिजबोला आणि इस्रायली सैन्यांमध्ये लढाई झाली, ज्यामध्ये इस्रायलला दक्षिण लेबनॉनमधून माघार घ्यावी लागली. यानंतर नरसल्लाहने घोषणा केली की इस्रायलला युद्धात पराभूत करणारी ही पहिली अरब संघटना आहे आणि आता ती थांबणार नाही. (फोटो: रॉयटर्स)

  • 8/9

    यामुळे इस्रायल संतप्त होता
    २००० च्या युद्धानंतर, २००६ पर्यंत सर्व काही ठीक होते, परंतु यादरम्यान हिजबोलाच्या सैनिकांनी इस्रायली सीमेत प्रवेश केला आणि दोन इस्रायली सैनिकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. यानंतर इस्त्रायली हवाई दलाने बेरूतमध्ये हल्ला केला ज्यात १२०० हून अधिक लेबनीज मारले गेले. हे युद्ध सुमारे ३४ दिवस चालले ज्यामध्ये इस्रायलने नसराल्लाहचा पाठलाग केला आणि त्याच्या अनेक स्थानांवर हल्ले केले. मात्र, नसराल्ला फरार झाला आणि तेव्हापासूनचा इस्रायलचा त्याचा शोध आता संपला आहे असं म्हणता येईल. (फोटो: रॉयटर्स)

  • 9/9

    हेही वाचा-Photos : अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, हटके लूकने वेधल…

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: When hezbollah chief hassan nasrallah pushed israeli forces back from lebanon know who it was and how the israeli army killed him spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.