-
Mumbai : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सकाळी हृदयाशी संबंधित तक्रारीनंतर रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. (पीटीआय फोटो)
-
धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. (एएनआय फोटो)
-
त्यांची अँजिओग्राफी देखील केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (PC : ShivSena UBT YT)
-
दरम्यान, जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ जमा होतात तेव्हा हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवते. याला ‘प्लेक’ म्हणतात. प्लेकचा हा थर रक्तवाहिन्या अरुंद करतो, रक्त प्रवाहात अडथळा आणतो. (फोटो: फ्रीपिक)
-
ही समस्या हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांपासून वंचित ठेवते, ज्यामुळे छातीत दुखणे, श्वास लागणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (फोटो: फ्रीपिक)
-
हार्ट ब्लॉकेजच्या बाबतीत, व्यक्तीला सतत आणि वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे, मूर्च्छा येणे, छातीत दुखणे, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, थोडेसे काम केल्यावर प्रचंड थकवा येणे, मान, पोटाच्या वरच्या भागात, जबड्यात दुखणे, अशा वेदना जाणवू शकतात. घसा किंवा गळा दुखण्याचा अनुभव येऊ शकतो. (फोटो: फ्रीपिक)
-
याशिवाय पाठदुखी, पाय किंवा हात दुखणे तसेच शरीराचे अवयव सुन्न होणे, अशक्तपणा किंवा थंडी जाणवणे यासारखी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे भविष्यात हृदयविकाराच्या झटक्याचे रूप घेऊ शकतात. त्यामुळे हार्ट ब्लॉकेजची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब चांगल्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक असते. (फोटो: फ्रीपिक)
-
हृदयाच्या अडथळ्याच्या समस्या टाळण्यासाठी, निरोगी आहार घ्या, नियमित व्यायाम करा, धूम्रपान सोडा, मद्यपान मर्यादित करा, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा आणि चांगली झोप घ्या. (फोटो: फ्रीपिक)
-
ही समस्या टाळण्यासाठी तळलेले अन्न, गोड पेये, पॅक केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस आणि फास्ट फूडपासून दूर राहा. कारण या पदार्थांमध्ये फॅट, कोलेस्टेरॉल आणि इतर घटक असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)
हेही वाचा- लॉरेन्स बिश्नोई टोळी ‘डी कंपनी’च्या वाटेवर?; हाजी मस्तान, करीम लाला ते अरुण गवळी ‘या’…
हार्ट ब्लॉकेजच्या समस्येमुळे उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, या आजाराची लक्षणे काय असतात, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
Uddhav Thackeray Admitted: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी हृदयाशी संबंधित तक्रारीनंतर रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान त्यांना हार्ट ब्लॉकेजचा त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले.
Web Title: Uddhav thackeray admitted to hospital after heart blockage problem know its symptoms and what things should be avoided spl