• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. blast reported outside crpf school in rohini delhi see photos of incident site spl

Photos : दिल्लीतील रोहिणीमध्ये CRPF शाळेबाहेर स्फोट, लोकांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण

Delhi news : दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेबाहेर आज सकाळी स्फोट झाला. अग्निशमन विभागाला या घटनेची ७.५० वाजता माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

October 20, 2024 11:32 IST
Follow Us
  • Rohini district explosion
    1/9

    दिल्लीतील प्रशांत विहार, रोहिणी जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेबाहेर रविवारी सकाळी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी ७.५० च्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. (Photos: PTI)

  • 2/9

    अग्निशमन विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी आग लागली नाही किंवा भिंतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले.

  • 3/9

    ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याठिकाणी जवळपास उभ्या असलेल्या वाहनांच्या आणि दुकानांच्या काचाही फुटल्याची माहिती मिळाली आहे.

  • 4/9

    सुदैवाची बाब म्हणजे या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शाळा आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

  • 5/9

    त्याच वेळी, पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे. स्फोटाची कारणे अद्याप समजू शकली नसून, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • 6/9

    स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घराबाहेर पडून परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला.

  • 7/9

    पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली.

  • 8/9

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवली आहे. अग्निशमन विभागाने लोकांना तपासात मदत करणारी कोणतीही माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

  • 9/9

    हेही पाहा- अटलबिहारी वाजपेयी ते संजय गांधी, ‘Emergency’ चित्रपटात ‘हे’ कलाकार ‘या’ ऐतिहासिक पात्रांमध्ये दिसणार!

TOPICS
दिल्लीDelhiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Blast reported outside crpf school in rohini delhi see photos of incident site spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.