• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. kalyan banerjee suspended from waqf board jpc after clash property from kolkata to delhi spl

JPC मधून निलंबित करण्यात आलेले कल्याण बॅनर्जी कोण आहेत?, कोलकाता ते दिल्लीपर्यंत आहे कोट्यवधींची मालमत्ता!

Kalyan Banerjee Property : वक्फ विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत झालेल्या भांडणानंतर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात आले आहे. कल्याण बॅनर्जी यांच्याकडे कोलकाता ते दिल्लीपर्यंत करोडोंची मालमत्ता आहे.

Updated: October 22, 2024 19:26 IST
Follow Us
  • Kalyan Banerjee suspended from JPC Meeting
    1/9

    मंगळवारी, संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) वक्फ विधेयकासंदर्भात बैठक झाली ज्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात आले. (फोटो: पीटीआय)

  • 2/9

    या बैठकीत हाणामारी झाल्यानंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदाराला पुढील बैठकीसाठी निलंबित केले आहे. वास्तविक, कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात हाणामारी झाली आणि त्यात कल्याण बॅनर्जीही जखमी झाले. यादरम्यान त्यांनी पाण्याची काचेची बाटली फोडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 3/9

    कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यासोबतच ते पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. कल्याण बॅनर्जी यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची मालमत्ता आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    myneta.info वेबसाइटनुसार कल्याण बॅनर्जी यांच्याकडे एक कोटींची पुस्तके आहेत. त्यांच्याकडे एकूण ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडे पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे एक शेतजमीन आहे जीची किंमत अंदाजे ७ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    कल्याण बॅनर्जी यांच्याकडे कोलकाता येथे १ कोटी २० लाख रुपयांचे घर आहे. यासोबतच पश्चिम बंगालमधील उत्तरपारा हुगळी भागात त्यांच्या पत्नीच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत १० लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    ग्रेटर कैलास १ मध्ये कल्याण बॅनर्जी यांच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत २ कोटी २० लाख रुपये आहे. (फोटो: कल्याण बॅनर्जी/इन्स्टा)

  • 8/9

    त्याचवेळी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण बॅनर्जी यांच्याकडे एकूण ३ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता आहे. (फोटो: कल्याण बॅनर्जी/इन्स्टा)

  • 9/9

    हेही पाहा – ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघच्या फिटनेसची खास झलक, यशराज बॅनरच्या ‘या’ चित्रपटा…

TOPICS
तृणमूल काँग्रेसTMCमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Kalyan banerjee suspended from waqf board jpc after clash property from kolkata to delhi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.