scorecardresearch

तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) प्रामुख्याने सक्रिय असणाऱ्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाची स्थापना १ जानेवारी १९९८ रोजी झाली. सध्याच्या प. बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. २६ वर्ष कॉंग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र जाण्याचा विचार करत तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) स्थापना केली.

२०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. टीएमसीचे (TMC) लोकसभेमध्ये २३ तर, राज्यसभेमध्ये १३ सदस्य आहेत. तसेच संसदेमध्ये २३० आमदार असलेला हा तिसऱ्या क्रंमाकाचा मोठा पक्ष आहे. जोरा घास फुल (दोन फुलं आणि गवत) हे या पक्षाचे चिन्ह आहे. १९९८च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टीएमसीचे ७ उमेदवार निवडून आले आणि हा पक्ष वाजपेयी सरकारमध्ये सहभागी झाला. पुढे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपसह 8 जागा जिंकल्या. २००० साली कोलकाता महानगरपालिकेवर या पक्षाची सत्ता आली. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत टीएमसी ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला.

२००४ व २००६ साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेले नुकसान पाहून त्यांनी एनडीए (NDA) सोडण्याचा निर्णय घेतला. बंगालमधील नंदीग्राममध्ये एका प्रकल्पासाठी तब्बल ७०,००० लोकांना स्थलांतर करावे लागणार होते. याला तृणमूल काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला. एकूण प्रकरणाचा फायदा पक्षाला २००९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. १९ जागा जिंकत ममता बॅनर्जी केंद्रीय रेल्वेमंत्री बनल्या.

२०११ ते २०२१ अशा दहा वर्षांमध्ये सलग विजय मिळवत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली आहे. २०२१ च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण शक्ती लावूनही भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. पण यावेळी त्यांना टीएमसीच्या मुकुल रॉय आणि सुवेंदू अधिकारी अशा मोठ्या नेत्यांना परभूत करण्यात यश मिळाले.
Read More
Swastik Maheshwari
चौथ्या टप्प्यातील मतदानाआधीच ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसी उमेदवाराची पत्नी भाजपात दाखल

स्वस्तिका माहेश्वरीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याकरता कोर्टात अर्ज केला आहे. भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत राणाघाट येथे पक्षाच्या मेळाव्यात…

Chances of BJP increasing seats in Lok Sabha elections in Bengal
बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता? तृणमूलसमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान?

तृणमूल तसेच भाजप समसमान जागा जिंकेल असा अंदाज आहे. फार तर भाजप २४ ते २५ पर्यंत जाऊ शकतो. अर्थात तृणमूलपेक्षा…

Saneshkhali rape case
संदेशखाली प्रकरणात यु टर्न; टीएमसी नेत्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपावर आरोप करत पीडित महिला म्हणाल्या, “आम्हाला कोऱ्या कागदावर…’

Sandeshkhali Rape Case Update : दोन महिलांची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यांच्या नावाने बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा या…

Loksabha Election 2024 CPIM Trinamool Congress West Bengal RSS
“आम्हाला संपवण्यासाठी RSS ने तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली”; डाव्यांचा आरोप

एकेकाळी पश्चिम बंगालमध्येही डाव्यांचे प्राबल्य अधिक होते. मात्र, आता तृणमूल काँग्रेस पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे सत्तेत आहे.

abhishek banerjee
“राहुल गांधींना पहाटे ६ वाजता…”; तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाले, “काँग्रेसशी आघाडीसाठी…!”

काँग्रेसबरोबर युती न होण्याला पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले.

CBI 6
तृणमूलला दहशतवादी घोषित करा! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून ममता बॅनर्जीच्या अटकेची मागणी

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा अशी मागणी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी केली.

wins 1 seat more than TMC Bengal BJP chief
TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा

सुकांता मजुमदार यांनी इंडियन एक्सप्रेसला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत पक्षाची रणनीती अन् राज्यातील प्रश्न, CAA, TMC भ्रष्टाचार…

mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेत बोलत असताना भाजपावर कडाडून टीका केली. मतदानपूर्व येणाऱ्या चाचण्या खोट्या असून भाजपा…

BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होत आहे. भाजपा महिलाविरोधी आहे, हे सांगण्याची एकही संधी तृणमूल पक्ष…

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार,…

संबंधित बातम्या