• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. navneet rana has property worth crores in these areas of mumbai know his net worth spl

नवनीत राणा किती श्रीमंत? मुंबईतील ‘या’ भागात करोडोंची मालमत्ता

Navneet Rana Property, Net Worth and House Price : माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे करोडोंची मालमत्ता आहे. मुंबईतील अनेक भागात त्यांची महागडी घरे आहेत.

Updated: November 17, 2024 18:08 IST
Follow Us
  • Who attacked Navneet Rana?
    1/10

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार नवनीत राणा याही रॅलीत पोहोचल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 2/10

    दरम्यान, नवनीत राणा अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या समर्थनार्थ सभेत पोहोचल्या होत्या. यादरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. मात्र, नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 3/10

    या घटनेची तक्रार नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात दिली आहे. नवनीत राणा या खूप श्रीमंत नेत्या आहेत. त्यांची महाराष्ट्रात करोडोंची संपत्ती आहे. महाराष्ट्रात त्यांच्याकडे कुठे संपत्ती आहे आणि किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 4/10

    myneta.info वेबसाइटनुसार, नवनीत राणा आणि त्यांच्या पतीच्या नावावर महाराष्ट्रातील अमरावती येथे १ कोटी ५६ लाख रुपयांची शेतजमीन आहे. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 5/10

    नवनीत राणा यांच्या पतीच्या नावावर एक व्यावसायिक इमारत देखील आहे जीची किंमत ४६,००,००० रुपये आहे. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 6/10

    माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावावर तीन निवासी घरे आहेत. पाटलीपुत्र ओशिवरा, मुंबई येथे एक कोटी रुपयांचे घर आहे, गोरेगावमध्ये एक फ्लॅट आहे ज्याची किंमत १ कोटी ६५ लाख रुपये आहे. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 7/10

    नवनीत राणा यांचे तिसरे घर खार पश्चिम येथे आहे, जे मुंबईतील सर्वात पॉश परिसरात आहे, ज्याची किंमत अंदाजे ४ कोटी रुपये आहे. एकंदरीत नवनीत राणा यांच्याकडे महाराष्ट्रात ८ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता आहे. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 8/10

    myneta.info वेबसाइटनुसार, नवनीत राणा यांची एकूण संपत्ती १७,५५,५३,४०० रुपये आहे. त्यांच्याकडे आणि पतीकडे ८ लाख रुपये रोख आहेत आणि सुमारे ३५ लाख रुपये बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये जमा आहेत. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 9/10

    नवनीत राणा आणि त्यांच्या पतीकडे सुमारे ६० लाखांचे दागिने आहेत. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)

  • 10/10

    त्याचवेळी माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरात दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक स्कॉर्पिओ आणि एक एमजी ग्लोस्टर कार आहे यांची किंमत अंदाजे १ कोटी २० लाख रुपये आहे. (Photo Source: Navneet Ravi Rana/FB)
    हेही पाहा – विधानसभेच्या मतदानात ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव किती दिसणार; महिलांचे मतदान ठरणार निर्णायक?, वाचा सविस्तर

TOPICS
नवनीत राणाNavneet Ranaमराठी बातम्याMarathi News

Web Title: Navneet rana has property worth crores in these areas of mumbai know his net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.