-
राज्यात विघानसभा निवडणुकीत महायुतीला बहूमत मिळालं आहे.
-
तर विरोधी महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
-
यामागे लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याचे राजकीय जाणकार सांगताना दिसत आहेत.
-
दरम्यान आता महायुती सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाल करत असली तरी लाडक्या बहिणींना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतिक्षा आहे.
-
निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी त्यामध्ये वाढ करुन २१०० रूपये देऊ अशी घोषणा महायुतीने केली होती.
-
तसा जाहीरनाम्यातही उल्लेख करण्यात आला होता, त्यामुळे आता हा वाढिव हप्त्याची प्रतिक्षा लाडक्या बहिणींना आहे.
-
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले “ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती झाली आहे”.
-
ते पुढे म्हणाले “आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो, आम्हाला बहुमत मिळेल. परंतु, तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. परंतु, तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलं आहे.
-
शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, “ठरल्याप्रमाणे….”
Cm Eknath shinde on ladki bahin scheme : निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी त्यामध्ये वाढ करुन २१०० रूपये देऊ अशी घोषणा महायुतीने केली होती.
Web Title: Cm eknath shinde on ladki bahin scheme 2100 rupees installment new statement spl