• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. finance minister nirmala sitharaman to set new record with 8th consecutive union budget spl

Budget 2025: निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सादर करणार सलग आठवा अर्थसंकल्प, बनवला विक्रम!

Finance Minister Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण यांच्या नावे सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणाऱ्या पहिल्या महिला असण्याचा विक्रमही आहे.

February 1, 2025 10:42 IST
Follow Us
  • Nirmala Sitharaman
    1/10

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २३ जुलै रोजी लोकसभेत २०२४-२५ आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता. (एक्स्प्रेस फोटो)

  • 2/10

    आज सीतारमण त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम करणार आहेत. अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. (REUTERS फोटो)

  • 3/10

    यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री असताना सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी १९५९-१९६४ या काळात पाचवेळा वार्षिक आणि एकावेळी अंतरिम बजेट सादर केले होते. (एक्स्प्रेस फोटो)

  • 4/10

    याशिवाय सीतारमण यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या अर्थमंत्र्यांनाही मागे टाकले आहे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 5/10

    दरम्यान, माजी अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांनीही सलग ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारमण त्यांच्या बरोबरीला गेल्या त्यानंतर आता त्या आठव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 6/10

    राजकारणात येण्यापूर्वी सीतारमण ब्रिटनमधील कॉर्पोरेट जगतात काम करत होत्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी इतरही अनेक मोठे यश संपादन केले आहे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 7/10

    २०१७ मध्ये त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री बनल्या. याआधी त्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री होत्या. अरुण जेटली आजारी पडल्यावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी मोदी सरकारमध्ये अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 8/10

    त्याच वेळी, निर्मला सीतारमण यांच्या नावे सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणाऱ्या पहिल्या महिला असण्याचा विक्रमही आहे. (पीटीआय फोटो)

  • 9/10

    २०१९ मध्ये निर्मला सीतारमण यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पहिले अर्थसंकल्पीय भाषण सादर केले होते. यापूर्वी, इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान असताना अल्प कालावधीसाठी अतिरिक्त विभाग म्हणून अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. (पीटीआय फोटो)

  • 10/10

    हेही पाहा- भारतात किती प्रकारचे कर आहेत? सरकारला सर्वाधिक महसूल कुठून मिळतो?

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025निर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: Finance minister nirmala sitharaman to set new record with 8th consecutive union budget spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.