• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. budget 2025 key takeaways major announcements made by finance minister nirmala sitharaman spl

Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे, काय झालं स्वस्त? शेतकरी-विद्यार्थ्यांसाठी सीतारमण यांनी कोणत्या केल्या घोषणा?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणा व त्यातील मुद्दे जाणून घेऊयात…

Updated: February 1, 2025 17:52 IST
Follow Us
  • Budget 2025 announcement in 15 points
    1/15

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग आठव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी यावेळी जवळपास १ तास २० मिनिटांचे भाषण केले आहे. (Photo: PTI)

  • 2/15

    ‘सर्वात वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था’
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. “आपली अर्थव्यवस्था सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी आहे. गेल्या १० वर्षांतील आपला विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि संरचनात्मक सुधारणांनी जगाचे लक्ष वेधले आहे. या काळात भारताच्या क्षमतेवरील विश्वास वाढला. पुढील ५ वर्षे सर्वांचा विकास साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पाकडे आपण पाहतो आहेत, असं यावेळी सीतारमण म्हणाल्या. (Photo: PTI)

  • 3/15

    यावेळी भाषणामध्ये त्यांनी केलेल्या घोषणांबद्दल जाणून घेऊयात. (Photo: PTI)

  • 4/15

    अर्थमंत्री म्हणाल्या…
    मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प
    विकासदर वाढवणे, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा हेतू
    विकसित राष्ट्र आमचे लक्ष्य
    विकासाची क्षमता जागतिक स्तरावर वाढणार
    सहा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष्य
    कर, उर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ विभाग, शेती विभाग
    धनधान्य योजना राबवणार, राज्यांची मदत घेणार
    शेती उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करणार
    माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा व क्रेडिट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार
    १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल
    १०० जिल्ह्यांवर लक्ष देणार (Photo: PTI)

  • 5/15

    विशेष मखाणा बोर्डाची स्थापना
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    तूर, उडीद व मसूर डाळींच्या उत्पादनावर विशेष लक्ष
    खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न
    निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न
    विशेष मखाणा बोर्डाची स्थापना, बिहारला फायदा
    भारताचा मत्स्य उत्पादनात दुसरा क्रमांक, उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी काम करु. (Photo: PTI)

  • 6/15

    लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी लोकांना रोजगार देणार
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, ५ लाख महिलांना लाभ, महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
    लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न
    लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी जणांना रोजगार देणार
    भारतीय टपाल यंत्रणेचे मोठ्या लॉजिस्टिक केंद्रांत रूपांतर करणार (Photo: PTI)

  • 7/15

    शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    पंतप्रधान धनधान्य कृषी योजना
    खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न
    फळं, भाजी उत्पादकांसाठी योजना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५ वर्षांची नवी योजना
    अंदमान आणि लक्षद्वीप बेटांसाठी मत्स्यबोर्ड
    किसान क्रेडिट कार्ड्स कर्जाची मर्यादा ५ लाख करणार
    युरिया आत्मनिर्भरता योजना १२.७ कोटी मेट्रिक टनांचा आसाममध्ये नवा प्लांट (Photo: PTI)

  • 8/15

    ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा, आयआयटीमधील हॉस्टेल सुविधा वाढवणार
    भारतीय भाषा पुस्तक योजना – विविध भाषांमध्ये पुस्तके देणार
    शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब अशा ५० लाख सुरु करणार
    शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा
    मेड इन इंडिया ब्रँडच्या नावाने टिकाऊ खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणार (Photo: PTI)

  • 9/15

    AI शिक्षणासाठी ५०० कोटी
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    AI शिक्षणासाठी ५०० कोटी, एआय एक्सलन्स सेंटर सुरु होणारऑ
    १०,००० मेडिकल जागा वाढवणार
    जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर
    MSME ना २० कोटींचे कर्ज
    स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट २० कोटी (Photo: PTI)

  • 10/15

    १० हजार फेलोशिप
    अर्थमंत्री म्हणाल्या…
    पुढच्या आठवड्यात नवीन कररचना विधेयक
    छोट्या व मध्यम उद्योगांसाठी व नवउद्योजकांसाठी नवीन क्रेडिट व्यवस्था
    पीएम रिसर्च फेलोशिप स्किमअंतर्गत १० हजार फेलोशिप (Photo: PTI)

  • 11/15

    २०२५ मध्ये आणखी ४० हजार नागरिकांना घरे देणार
    न्यूक्लिअर एनर्जी मिशनसाठी २०,०० कोटींची तरतूद
    मेरिटाईम डेव्हलपमेंड फंडसाठी २५,००० कोटींची तरतूद (Photo: PTI)

  • 12/15

    काय होणार स्वस्त?
    इलेक्ट्रॉनिक वाहने
    मोबाईल
    एलईडी, एलसीडी टीव्ही
    चामड्याच्या वस्तू
    कॅन्सरची ३६ औषधे
    बॅटरी
    स्वदेशी कपडे (Photo: PTI)

  • 13/15

    चामड्याच्या फुटवेअरसाठी योजना
    सागरी जैवविविधता विकास योजनेसाठी अतिरिक्त २५ हजार कोटी (Photo: PTI)

  • 14/15

    ‘शाळांमध्ये ५० हजार अटल टिंकरिंग लॅब्स उभारणार’
    दरम्यान, विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सरकारी शाळांमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार अटल टिंकरिंग लॅब्स तयार करु, अशी घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व नवोपक्रमाची भावना निर्माण होईल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करु, असं सीतारमण म्हणाल्या. (Photo: PTI)

  • 15/15

    हेही पाहा- Budget 2025 : देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि लहान अर्थसंकल्पीय भाषण कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे?

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025निर्मला सीतारमणNirmala Sitharamanभारतीय विद्यार्थीIndian Studentsमराठी बातम्याMarathi NewsशेतकरीFarmers

Web Title: Budget 2025 key takeaways major announcements made by finance minister nirmala sitharaman spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.