• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi inaugurates wildlife centre at vantara spends adorable moments with animals feeds lion cubs kvg

Pm Modi at Vantara: पंतप्रधान मोदींची वनतारा भेट; ‘सिंहाच्या छाव्याला दूध पाजलं, वन्य प्राण्यांना खाऊ घातलं’

PM Narendra Modi at Vantara in Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना आज त्यांनी जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा केंद्राला भेट दिली आणि वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी वन्यप्राण्यांबरोबर त्यांनी मनमोकळे क्षण घालवले.

March 4, 2025 15:33 IST
Follow Us
  • PM Narendra Modi at Vantara in Gujarat 8
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन केले.

  • 2/10

    वनतारामध्ये दोन हजारांहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेण्यात येते.

  • 3/10

    पंतप्रधान मोदी यांनी आज वनतारा येथे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेतला. तसेच वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयालाही भेट दिली. प्राण्यांवरील उपचारांसाठी येथे असलेल्या उपकरणांची त्यांनी माहिती घेतली.

  • 4/10

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वन्यजीव रुग्णालयातील एमआरआय कक्षाला भेट दिली. एशियाटीक सिंहाचे एमआरआय करताना त्यांनी पाहणी केली. याशिवाय बिबट्याच्या ऑपरेशन होत असतानाही त्यांनी उपचाराचा आढावा घेतला.

  • 5/10

    वनतारा येथे देशभरातून रेस्क्यू केलेल्या हत्तींना ठेवले गेले आहे. येथे एलिफंट रुग्णालय असून तेथे हत्तींवर उपचार केले जातात. या रुग्णालयालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली.

  • 6/10

    पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आशिया आणि इतर प्रजातींच्या सिहांच्या पिल्लांशी खेळण्याचा आनंद घेतला. त्यांना जवळ घेत दूध पाजले.

  • 7/10

    यावेळी लुप्तप्राय होत असलेल्या बिबट्याच्या प्रजातीच्या पिलालाही त्यांनी जवळ घेऊन दूध पाजले. याशिवाय पांढऱ्या सिंहाच्या छाव्यालाही त्यांनी दूध पाजले. हा छावा वनतारा केंद्रातच जन्माला आला.

  • 8/10

    प्राणीसंग्रहालयालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. गोल्डन टायगर आणि स्नो टायगरला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. इथे बसून पंतप्रधान मोदींनी फोटो काढले.

  • 9/10

    वनताराला नुकताच ‘प्राणी मित्र’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या निमित्ताने वनतारा पुनर्वसन केंद्राचे महत्त्व, तेथील सोयी-सुविधा, वन्यजीवांना देण्यात येणारे उपचार याचे मोदींनी कौतुक केले.

  • 10/10

    वनतारा हे गुजरातमधील जामनगर येथे वसलेले एक विशेष वन्यजीव पुनर्वसन केंद्र आहे. पंतप्रधान मोदींच्या वनतारा दौऱ्यातील अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

TOPICS
गुजरातGujaratपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiप्राणीAnimalवन्यजीवनWildlife

Web Title: Pm narendra modi inaugurates wildlife centre at vantara spends adorable moments with animals feeds lion cubs kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.