• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is the mastermind behind donald trump s tariff plan the real competition is with this country spl

अमेरिकेच्या टेरिफ प्लॅनमागील मास्टरमाइंड कोण? ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही केलं आहे व्यापार धोरणांवर काम….

Mastermind Behind Donald Trump’s Tariff Plan: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ योजनेमागील मेंदू असलेली व्यक्ती अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहे. भारत ज्या देशाशी स्पर्धा करत आहे त्याच्याशी ही व्यक्ती अमेरिकेकडून स्पर्धा करत आहे.

Updated: April 7, 2025 11:29 IST
Follow Us
  • Mastermind Behind Donald Trump's Tariff Plan
    1/10

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ योजनेमुळे जगभरात घबराट निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन निर्यातीवर जास्त कर लादणाऱ्या देशांवर हे कर लादले आहेत. (Photo: Reuters)

  • 2/10

    डोनाल्ड ट्रम्प यांनी याला रेसिप्रोकल टेरिफ असे नाव दिले आहे, हे टेरिफ २ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ‘टेरिफ’ हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, प्रचारात त्यांनी म्हटले होते की ते निवडून येताच ते हा टेरिफ प्लान लागू करतील. (Photo: Reuters)

  • 3/10

    या शुल्कामागील मेंदू कोणाचा आहे?
    ज्या टेरिफ प्लॅनने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांचा नसून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या पीटर नवारो यांच्या कल्पनेतून आला आहे. (Photo: Peter Navarro/Insta)

  • 4/10

    ट्रम्प यांचे खास सहकारी
    पीटर नवारो, ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असण्याबरोबरच, एक प्रमुख अमेरिकन अर्थशास्त्रज्ञदेखील आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पीटर यांनी व्यापार धोरणाला आकार देण्याचे काम केले. (Photo: Reuters)

  • 5/10

    व्यापार अजेंडामागील मेंदू
    पीटर नवारो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात व्यापार आणि उत्पादन विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतींच्या संरक्षणवादी व्यापार अजेंडामागील “मुख्य मेंदू” नवारो यांचाचं असल्याचे म्हटले जाते. (Photo: Reuters)

  • 6/10

    या देशातील खरी स्पर्धा
    पीटर नवारो यांचे काम अमेरिकन उत्पादन वाढविण्यासाठी, व्यापारातील तूट कमी करण्यासाठी आणि इतर देशांकडून, विशेषतः चीनकडून होणाऱ्या अनुचित व्यापार पद्धतींचा सामना करण्यासाठी शुल्काचा वापर करण्याच्या दीर्घकालीन विश्वासातून टेरिफ योजना निर्माण करण्यात आली आहे. (Photo: Reuters)

  • 7/10

    अमेरिका-चीन व्यापार युद्धामागील मेंदूही पीटर यांचाच आहे.
    डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा (२०१७-२०२१) अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध सुरू करण्याचे श्रेय पीटर नवारो यांना जाते. त्यावेळीही चिनी वस्तूंवर शुल्क लादण्याची कल्पनाही त्यांनीच दिली होती. (Photo: Reuters)

  • 8/10

    व्यापार आणि उत्पादन धोरण विभागाचे संचालक
    नवारो हे जागतिक पुरवठा साखळी अमेरिकेत परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये विशेषतः त्यांच्यासाठी व्यापार आणि उत्पादन धोरण विभाग तयार केला होता, ज्याचे पीटर संचालक होते. (Photo: Reuters)

  • 9/10

    पीटर नवारो यांचा लढा अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आर्थिक प्रतिस्पर्धी चीनशी आहे. त्यांच्या व्यापार धोरणांचे उद्दिष्ट चीनचा प्रभाव कमी करणे आहे. (Photo: Reuters)

  • 10/10

    राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे?
    शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, पीटर नवारो यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन येथे अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाचे प्राध्यापक होते. (Photo: Reuters)

TOPICS
अमेरिकाAmericaडोनाल्ड ट्रम्पDonald Trumpमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is the mastermind behind donald trump s tariff plan the real competition is with this country spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.